लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : मुलचेरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शासनाच्या वतीने विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.१६ नोव्हेंबर रोजी शुक्रवारला मुलचेरा येथे आयोजित जनता तक्रार दरबारात अधिकाऱ्यांना सूचना देताना ते बोलत होते. यावेळी भाजपचे लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष डी. के. मेश्राम, जिल्हा सचिव सुभाष गणपती, तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, महिला आघाडीच्या मुलचेरा तालुका अध्यक्ष तथा सरपंच ममता बिश्वास, सामाजिक कार्यकर्ते उरेते, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे उपस्थित होते. भाजपचे तालुका महामंत्री निखिल हलधर, मारुती पेंदाम, बंगाली आघाडीचे विधान बैध्य, उपाध्यक्ष अशोक बडाल, सचिव मारुती कोहडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय बिश्वास, कोषाध्यक्ष शंकर दास, खोकन पाल व भाजपचे व बंगाली आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी जनता तक्रार दरबारात अनेक नागरिक व शेतकºयांनी आपआपल्या अडचणी व समस्या सांगितल्या. नागरिकांना वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, चेन्ना प्रकल्प त्वरित सुरु करण्यात यावा, शेतकºयांना कर्ज माफी योजनेचा लाभ देण्यात यावा, डिमांड भरलेल्या शेतकरी बांधवांना विद्युत कनेक्शन देण्यात यावे, तालुक्यातील रस्ते व पुलाची कामे तात्काळ मार्गी लावावी, मुद्रा लोन व इतर बँक सुविधा तसेच विमा योजनेचा लाभ नागरिकांना तात्काळ देण्यात यावा, श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ नागरिकांना दर महिन्याला देण्यात यावा, वन जमिनीसाठी ७५ वर्षांची अट शिथिल करण्यात यावी, असे प्रश्न नागरीकांनी जनता तक्रार दरबारात मांडले.यावेळी खासदार अशोक नेते यांनी सर्व प्रश्न, अडचणी जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकारी व विभाग प्रमुखांना दिल्या. जनता तक्रार दरबारात सर्व विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख व नागरिक, महिला तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाचा वेग वाढविण्यासाठी सूचनांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 1:26 AM
मुलचेरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शासनाच्या वतीने विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.
ठळक मुद्देखासदारांचे निर्देश : मुलचेरातील जनता दरबारात घेतला विकास कामांचा आढावा