गडचिरोली व अहेरीत दाखल होणार चार शिवशाही बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:45 AM2018-04-08T00:45:22+5:302018-04-08T00:45:22+5:30

अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या शिवशाही बसेसने महाराष्ट्रातील प्रवाशांना भुरळ घातली आहे. गडचिरोली विभागात सुध्दा चार शिवशाही बसेस पुढील दोन ते तीन दिवसात दाखल होणार आहेत.

Four Shivshahi buses to enter Gadchiroli and Aheri | गडचिरोली व अहेरीत दाखल होणार चार शिवशाही बसेस

गडचिरोली व अहेरीत दाखल होणार चार शिवशाही बसेस

googlenewsNext
ठळक मुद्देएसीची सुविधा : नागपूर व हैदराबादसाठी धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या शिवशाही बसेसने महाराष्ट्रातील प्रवाशांना भुरळ घातली आहे. गडचिरोली विभागात सुध्दा चार शिवशाही बसेस पुढील दोन ते तीन दिवसात दाखल होणार आहेत. त्यामुळे शिवशाहीच्या प्रवासाचा आनंद गडचिरोलीवासीयांनाही घेता येणार आहे.
गडचिरोली विभागाला प्राप्त होणाऱ्या एकूण चार बसेसपैकी दोन बसेस अहेरी आगारात तर दोन बसेस गडचिरोली आगारात ठेवल्या जाणार आहेत. अहेरी आगारातून हैदराबादसाठी दररोज सायंकाळी ७ वाजता चंद्रपूर मार्गे हैदराबादसाठी बस सोडली जाणार आहे. ही बस दुसºया दिवशी सकाळी ७ वाजता हैदराबाद येथे पोहोचेल. त्याच दिवशी रात्री ८ वाजता हैदराबादवरून दुसरी शिवशाही बस सुटेल. ही बस सकाळी ८ वाजता चंद्रपूर मार्गे अहेरी येथे पोहोचेल. त्यानंतर अहेरी-चंद्रपूर ही बसफेरी अहेरीवरून १०.१५ वाजता सोडली जाईल. ही बस चंद्रपूर येथे १ वाजता पोहोचेल. त्यानंतर चंद्रपूरवरून १.३० वाजता निघून सायंकाळी ५ वाजता अहेरी येथे पोहोचेल.
गडचिरोली-नागपूर मार्गावर गडचिरोली आगाराच्या दोन बसेस व नागपूर आगाराच्या दोन बसेस अशा एकूण चार बसेस चालविल्या जातील. गडचिरोली येथून शिवशाही बस सकाळी ५.४५, ६.३०, १०.१५, ११.००, दुपारी ३ वाजता व सायंकाळी ४.००, ६.३० व रात्री ७ वाजता सोडली जाणार आहे. नागपूरवरून गडचिरोलीसाठी सकाळी ५.४५, ६.३०, १०.३०, ११.००, दुपारी २.३०, ३.०० रात्री ७.१५ व ८ वाजता बस सोडली जाणार आहे. सामान्य प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी साध्या बसेसच्या वेळेत कोणताही बदल नाही. या दोन बसेसच्या मधल्या वेळात शिवशाही बसेस सोडल्या जातील. गडचिरोलीत बसेस पुढील दोन ते चार दिवसांत दाखल होतील. औपचारीक लोकार्पणानंतर सदर बस प्रवाशांच्या सेवेत दाखल केली जाईल, अशी माहिती गडचिरोली एसटी विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी निलेश बेलसरे यांनी लोकमतशी बोलताना दिले आहे.
शिवशाहीमध्ये या आहेत सुविधा
एसटी महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही बस सहा महिन्यांपूर्वी दाखल झाली. ही बस पूर्णपणे वातानुकुलीत आहे. पुशबॅकची सुविधा आहे. बसमध्ये वायफाय आहे. प्रत्येक सीटला मोबाईल चार्जची सुविधा आहे. फायर सेफ्टीसाठी सुमारे तीन लाख रूपयांची अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. केवळ ४२ प्रवासी बसण्याची व्यवस्था आहे.
गडचिरोली-नागपूरसाठी २७३ रूपये तिकीट
शिवशाही बसचे गडचिरोली ते नागपूरचे तिकीट २७३ रूपये आहे. गडचिरोली-आरमोरी ५७ रूपये, गडचिरोली-ब्रह्मपुरी ९५ रूपये, गडचिरोली-नागभिड १२३ रूपये, गडचिरोली-उमरेड २०७ रूपये एवढे तिकीट आहे. सदर बस गडचिरोलीवरून निघाल्यानंतर केवळ आरमोरी, ब्रह्मपुरी, नागभीड, भिवापूर, उमरेड या पाचच ठिकाणी थांबणार आहे. सदर बस ३.३० तासामध्ये नागपूरला पोहोचणार आहे.
अहेरी-चंद्रपूर १९८ रूपये, आलापल्ली-चंद्रपूर १८८ रूपये व अहेरी-हैदराबादसाठी ८०८ रूपये तिकीट आकारली जाणार आहे.

Web Title: Four Shivshahi buses to enter Gadchiroli and Aheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.