मधुमेह रुग्णांना काढ्याचे निःशुल्क वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:17+5:302021-02-14T04:34:17+5:30
देसाईगंज : येथील नंदनवन काॅलनीतील गंगासारू नॅचरोपॅथी मेडिकल काॅलेज, हाॅस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या वतीने मधुमेह रुग्णांना निःशुल्क शुगर काढ्याचे ...
देसाईगंज : येथील नंदनवन काॅलनीतील गंगासारू नॅचरोपॅथी मेडिकल काॅलेज, हाॅस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या वतीने मधुमेह रुग्णांना निःशुल्क शुगर काढ्याचे वितरण करण्यात आले. याचा लाभ ७० मधुमेह रुग्णांनी घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष शालू दंडवते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक राजू जेठानी, नरेश विठ्ठलानी, किशोर मेश्राम, डाॅ. चंद्रशेखर बांबोळे, गणेश उईके, अर्जुन सुवर्णकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून ३३ वनस्पतींच्या जडीबुटीपासून तयार करण्यात आलेला काढा अमावस्येच्या दिवशी वितरित करण्यात आला. काढ्याचे जनक डाॅ. श्रीकृष्ण गंगाराम वाघमारे यांनी काढ्याचे गुणधर्म सांगितले. कार्यक्रमाचे संचालन विक्की भैसारे, प्रास्ताविक डाॅ. श्रीकृष्ण वाघमारे तर आभार प्रज्ञा वाघमारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी बबन रामटेके, असिमा मेश्राम, अल्का वाघमारे यांनी सहकार्य केले.