चामाेर्शी शहरात १३२ केव्ही विद्युत उपकेंद्राची मागणी पूर्ण झाली, मात्र वादळवारा नसतानाही येथील वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चामोर्शी विद्युत वितरणचे शाखा अभियंतापद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असल्याने येनापूरचे शाखा अभियंता यांना अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. दाेन ठिकाणचे काम पाहताना त्यांच्यावर बराच ताण पडत आहे. याशिवाय इतरही पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील चामोर्शी तालुका हा सर्वात मोठा म्हणजे १९२ गावांनी वेढलेला तालुका आहे. दोन लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. या ठिकाणी तांदळाचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात चालतो. येथे राईस मिलचे उद्योग भरपूर आहेत. विद्युत वितरण कंपनीकडून सर्व उद्योगांना वीजपुरवठा होत असतो. तसेच खासगी लघुउद्योग इलेक्ट्रिक वेल्डिंग, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आदी उद्योग या विद्युतवर चालतात. गेल्या एक वर्षापासून शिक्षण घेणारे विद्यार्थी व वर्क फ्राॅम होम करणारे कर्मचारी हे घरातच राहून काम करत आहेत; मात्र महावितरणकडून दीड महिन्यापासून दररोज दिवसा चार ते पाच वेळा तर कधीकधी दहा वेळा विद्युतपुरवठा खंडित होताे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी व बँकेच्या कामात व्यत्यय येत आहे. खंडित विद्युत पुरवठ्यामुळे येथील सामान्य जनतेचे फार हाल होत आहेत. याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी भाजप पदाधिकारी व नागरिकांनी उपविभागीय अभियंता पीयूष ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ठाकरे यांनी सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना भाजप प्रदेश सदस्य विजय कोमेरवार, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, प्रतीक राठी, संजय चिंतलवार, आकाश पालारवार आदी उपस्थित होते. आ. डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी व आल्लापलीचे विभागीय अभियंता यांनासुध्दा निवेदन देण्यात आले आहे.
बाॅक्स
या आहेत प्रमुख मागण्या
चामाेर्शी शहरासस तालुक्याच्या ग्रामीण भागात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होऊ नये यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढावा, उपविभागात रिक्त असलेली पदे भरावी, शहरासाठी स्वतंत्र वितरण विभाग देण्यात यावा. चामोर्शी ग्रामीण साठी वेगळे स्वंत्रत वितरण केंद्र तयार करावे, शहरासाठी स्वतंत्र फिडर देण्यात यावे, कृषिपंपाचा पुरवठा वेगळ्या फिडरणे करावा आदी मागण्यांचा समावेश निवेदनात हाेता.
===Photopath===
190521\19gad_2_19052021_30.jpg
===Caption===
उपविभागीय अभियंता पीयूष ठाकरे यांना निवेदन देताना पदाधिकारी.