लोकमत न्यूज नेटवर्कघोट : गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजवस्तींची गावे अद्यापही विकासापासून वंचित आहेत. या गावांचा विकास करण्यासाठी बंगाली गावांना स्वतंत्र निधी देण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या बंगाली आघाडीच्या वतीने राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली.खासदार अशोक, आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा व समाजबांधवांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, राजीव शहा, खराती आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, बंगाली गावांना गावांच्या विकासासाठी पुनर्वसन निधी अंतर्गत कामे मंजूर करण्यात यावी, बंगाली डीएड्, बीएड् अर्हताधारक विद्यार्थ्यांची गडचिरोली जिल्ह्याच्या बंगाली भाषिक शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. गडचिरोली जिल्ह्याच्या बंगाली गावांची भौगोलिक रचना, क्षेत्रफळ मोठे असून ग्रामपंचायतीला अल्प विकास निधी मिळत असल्याने अनेक गावे विकास योजनेपासून वंचित आहे. बंगाली गावाच्या विकासासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केली. यासंदर्भात खा.नेते, आ.डॉ.होळी यांनी ना.मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली. सदर मागणीचा विचार करून राज्य शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भाचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळाला दिले.
बंगाली गावाच्या विकासासाठी निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:26 AM
गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजवस्तींची गावे अद्यापही विकासापासून वंचित आहेत. या गावांचा विकास करण्यासाठी बंगाली गावांना स्वतंत्र निधी देण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या बंगाली आघाडीच्या वतीने राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली.
ठळक मुद्देखासदार, आमदारांची मंत्र्यांशी चर्चा : भाजपच्या बंगाली आघाडीची मागणी