गडचिरोली शहरात काँग्रेस ८,५०३ मतांनी माघारली

By admin | Published: May 19, 2014 11:30 PM2014-05-19T23:30:37+5:302014-05-19T23:30:37+5:30

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या गडचिरोली शहरात भारतीय राष्टÑीय काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे.

In Gadchiroli, Congress has withdrawn by 8,503 votes | गडचिरोली शहरात काँग्रेस ८,५०३ मतांनी माघारली

गडचिरोली शहरात काँग्रेस ८,५०३ मतांनी माघारली

Next

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या गडचिरोली शहरात भारतीय राष्टÑीय काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. २३ वार्ड असलेल्या गडचिरोली नगर पालिकेच्या क्षेत्रात भाजपला ८ हजार ५०३ मतांची आघाडी मिळाली आहे. शहरातील ३४ मतदान केंद्रावर भाजपने आघाडी मिळविली असून काँग्रेसचे नगर सेवक असलेल्या वार्डातही भाजपने प्रचंड मुसंडी मारली आहे. युवाशक्ती आघाडी, भाजप यांच्या युतीमुळे भाजपला हे प्रचंड यश गडचिरोली शहरात मिळाले आहे. गडचिरोली नगर पालिकेच्या अंतर्गत एकूण ३४ मतदान केंद्र येतात. मतमोजणीनंतर या मतदान केंद्रावरील मतदानाची पक्षनिहाय स्थिती समोर आली आहे. गडचिरोली शहरातील सर्व मतदान केंद्र मिळून काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेवराव उसेंडी यांना ४ हजार ९९९ मते मिळाले आहे तर भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना १३ हजार ५०२ मते मिळाले आहे. भाजपने या शहरात ८ हजार ५०३ मतांची आघाडी मिळविली आहे. बसपाने १४०० मते गडचिरोली शहराच्या मतदान केंद्रावर मिळविले आहे. शहरातील पाच मतदान केंद्रावर तर काँग्रेस उमेदवाराला दोन अंकी मतदान मिळाले आहे. काँग्रेस व भाजपच्या मतांचा फरकही प्रत्येक मतदान केंद्रावर दीडशे ते दोनशे मतांच्या फरकाने आहे. त्यामुळे काँग्रेससाठी गडचिरोली शहरातील मतदान भविष्यातही धोक्याची घंटाच आहे. गडचिरोली नगर पालिका युवाशक्ती आघाडीच्या हातात असून त्यांचे १३ नगर सेवक आहे. काँग्रेसचे तीन तर राष्टÑवादी काँग्रेसचे पाच नगर सेवक आहे. भाजप व अपक्ष असे प्रत्येकी एक नगरसेवक आहे. गडचिरोली शहरात राष्टÑवादी काँग्रेस पक्षानेही पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश पोरेड्डीवार यांच्या माध्यमातून काँग्रेस उमेदवाराला मोठी मदत निवडणुकीत गेली. राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने इंदिरा गांधी चौकात स्वतंत्र प्रचार कार्यालय सुरू केले होते. या कार्यालयातील उद्घाटनाला दिग्गजांच्या उपस्थितीत काँग्रेस उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला होता, असे असताना राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्याही नगरसेवकांच्या वार्डात मतांचा प्रकाश काँग्रेस उमेदवारासाठी कुठे पडलेला दिसत नाही. गडचिरोली शहरात काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची प्रचार यंत्रणेला मोठी रसदही पोहोचविण्यात आली होती. परंतु उमेदवाराविषयी असलेली नाराजी शहरी मतदारांनी मतदानातून दाखवून दिली आहे. विद्यमान आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी गडचिरोली शहरात आपल्या निधीतून नाल्या व रस्त्याची कामे केलीत. परंतु त्याचाही काहीही फायदा या निवडणुकीत पक्षाला झाल्याचे दिसत नाही. जनाधार नसलेल्या अनेक लोकांकडे प्रचाराची धूरा असल्याने काँग्रेसचे शहरात पानिपत झाल्याचे सांगण्यात येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: In Gadchiroli, Congress has withdrawn by 8,503 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.