गडचिरोलीत पेरणीपूर्व शेत मशागतीच्या कामाला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 04:00 PM2020-06-19T16:00:22+5:302020-06-19T16:00:49+5:30

कोरोनाच्या संकटातच तालुक्यातील शेतकरी वर्ग शेत मशागतीसाठी बांधावर दखल झाला असून, पेरणीपूर्वी शेत मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येते आहे.

In Gadchiroli, farmers are preparing soil for farming | गडचिरोलीत पेरणीपूर्व शेत मशागतीच्या कामाला आला वेग

गडचिरोलीत पेरणीपूर्व शेत मशागतीच्या कामाला आला वेग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: खरीप पिकांचा हंगामा जवळ आलेला असून जून महिन्यात सर्वत्र पेरणीच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा शेत मशागतीसाठी जोमाने कामाला लागला आहे. राज्यावर नेव्हे तर संपूर्ण देशात कोरोना व्हयरसचे संकट उभे ठाकले आहे. या संकटातून सावरण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना मात्र बांधावर जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोरोनाच्या संकटातच तालुक्यातील शेतकरी वर्ग शेत मशागतीसाठी बांधावर दखल झाला असून, पेरणीपूर्वी शेत मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येते आहे. शेतीची मशागत केली,तरच धान्य घरात येईल; अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. शेतातून येणाऱ्या धान्यावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट अवलंबून असते. पीक झालेच नाही तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे रहाते. मात्र दरवर्षी संकटावर मात करून उन्हाळ्यात धान, कापूस, मिरची उत्पादन घेत आता परत एकदा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. काळया मातीच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. कोरोनाच्या संकटातही हा शेतकरी काळया मातीच्या सेवेसाठी सज्ज आहे. सध्या उन्हाचा पारा ४० ते ४५ अंशावर गेला असुन, तापमानात वाढ होत आहे.परंतु भविष्याची चिंता असलेला शेतकरी आग ओकणाऱ्या सूर्यासबोतच पेरणीपूर्व कामाला लागला आहे. तालुक्यात ७५ टक्के शेतकऱ्यांकडे निसर्गावर अवलंबून असलेली शेती आहे. त्या मुळे मशागतीच्या कामाला वेग येत आहे. सततच्या आसमानी व सुलतानी संकटातून सावरून एक दिवस आपला येईलच म्हणत शेतकरी मोठ्या जोमाने शेत मशागतीच्या कामाला लागला आहे.

Web Title: In Gadchiroli, farmers are preparing soil for farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.