गडचिरोलीत पोलीस उपनिरीक्षकानेच केला महिला शिपायाचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:46 AM2020-06-20T10:46:29+5:302020-06-20T10:46:58+5:30
भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने एका महिला शिपायाचा विनयभंग केल्याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने एका महिला शिपायाचा विनयभंग केल्याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. समीर दाभाडे (31) असे त्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.
तक्रारीनुसार सदर महिला पोलीस शिपाई 30 मे रोजी रात्री कर्तव्यावर असताना पीएसआय दाभाडे यांनी हात पकडून लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मानसिक तणावात असलेल्या पीडितेने 18 जून रोजी तक्रार दाखल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची शहानिशा करून दाभाडे यांच्यावर विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे करत आहेत.