कोरोना रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढण्यासाठी एप्रिल आणि मे हे दोनच महिने कारणे कारणीभूत ठरले. लॉकडाऊन असतानाही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरूवात झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण कायम राहिले.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या ६.४५ वर आला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तो १७.३४ तर मे च्या पहिल्या आठवड्यात २०.२० वर गेला होता. पुढील काही दिवसात तो आणखी घटण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये यापेक्षाही जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे.
(बॉक्स)
यामुळे झाला रेड झोनमध्ये समावेश
राज्यात १ एप्रिलपासून लॉकडाऊन लागले. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात कोरोनाची काय स्थिती होती त्याची आणि आताच्या स्थितीची तुलना केल्याने जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर दिसली. वास्तविक मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ १०५६ कोरोना रुग्ण होते. एप्रिलमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढून ते १० हजारांवर गेले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्थिती कायम होती. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी आणि आताची रुग्णसंख्या यांची तुलना केल्याने जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ वाढलेला दिसून आला. परिणामी गडचिरोलीचे नाव रेड झोनमध्ये गेले.
(बॉक्स)
लसीकरणाने घेतला वेग
जिल्ह्यात आता लसीकरणानेही वेग घेतला असून दररोज दोन ते अडीच हजार लस टोचल्या जात आहेत. विशेष म्हणजे आता लोकांनी केंद्रावर येण्याची वाट न पाहता गावागावातील शाळा, समाजमंदिरात लसीकरण शिबिर लावले जात आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.