पुलाच्या कडेला कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:37 AM2021-04-16T04:37:23+5:302021-04-16T04:37:23+5:30
आरमोरी तालुक्यातील वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीवरील मोठ्या पुलाच्या दोन्ही टोकावर रेती, मातीचा व कचऱ्याचा ढीग पडला आहे. हा कचऱ्याचा ...
आरमोरी तालुक्यातील वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीवरील मोठ्या पुलाच्या दोन्ही टोकावर रेती, मातीचा व कचऱ्याचा ढीग पडला आहे. हा कचऱ्याचा ढीग अनेक दिवसापासून तसाच पडून आहे. पण याकडे बांधकाम विभागाचे लक्ष नाही. या कचऱ्याचा ढिगामुळे लाखो रुपये खर्चून बांधलेल्या पुलाचे सौंदर्य बिघडते. पुलावर साचलेल्या कचऱ्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने विल्हेवाट लावावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
बॉक्स
सुरक्षा कठडे चोरीला...
वैरागड-रांगी मार्गावरील कपडा घाटावरील मोठ्या पुलाला लावलेले लोखंडी सुरक्षा कठडे मागील दोन वर्षापासून सतत चोरीला जात आहेत. या पुलावर आता निम्मीही सुरक्षा कठडे बाकी नाहीत. पण आरमोरी सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता याप्रकरणी पोलिसात तक्रार करून साधी चौकशी करायला तयार नाहीत.
===Photopath===
150421\15gad_6_15042021_30.jpg
===Caption===
पुलावर असा कचरा पसरला आहे.