विकासासाठी संघटित व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 10:03 PM2017-11-05T22:03:46+5:302017-11-05T22:04:05+5:30
कुणबी समाज हा जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात विखुरलेला आहे. मात्र सदर समाजाची अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात प्रगती झाली नाही. समाजाचा विकास करण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय तरणोपाय नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : कुणबी समाज हा जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात विखुरलेला आहे. मात्र सदर समाजाची अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात प्रगती झाली नाही. समाजाचा विकास करण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय तरणोपाय नाही. त्यामुळे चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील कुणबी समाज बांधवांनी संघटीत व्हावे, असे आवाहन जि.प. सदस्य विद्या हिंमत आभारे यांनी केले.
चामोर्शी शहर कुणबी समाज संघटनेच्या वतीने रविवारी येथील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात कायदेविषयक शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम तथा समाज मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक लोढे होते. प्रमुख अतिथी म्हणून अॅड. माधुरी रोहणकर, श्रीकांत कुत्तरमारे, डॉ. देवेंद्र मुनघाटे, प्राचार्य डॉ. वंदना चौथाले, डॉ. गोविंदराव टिचकुले, खुशाल चुधरी, रमेश काकडे, संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळू दहेलकर, धोंडबाजी मोरांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कुणबी समाज विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी आपआपासातील मतभेद दूर सारणे गरजेचे आहे. समाजात जनजागृती करून समाजाची चळवळ बळकट करण्याची ही वेळ आहे. यासाठी प्रत्येक समाज बांधवाने सहकार्य करावे, असेही विद्या आभारे यावेळी म्हणाल्या.
याप्रसंगी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक खुशाल चुधरी, लिपीक रमेश काकडे यांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. माधुरी रोहणकर, श्रीकांत कुत्तरमारे, डॉ. देवेंद्र मुनघाटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल येलमुले, अविनाश चौधरी, दिनेश चुधरी, झाडे, सदाशिव वाघरे, हिंमतराव आभारे, गोकुळ झाडे, कुडे, भानूदास किनेकार, संजय खेडेकर, ज्ञानेश्वर गोहणे, धनराज पोरटे, कोकेश्वर लडके, विनायक रोहणकर, दिवसे, नामदेव किनेकार, नागेश भोयर, देवाजी काकरे, यादव पाल आदींनी सहकार्य केले. प्रास्ताविक पुरूषोत्तम घ्यार, संचालन भोयर यांनी केले तर आभार पोरटे यांनी मानले. कार्यक्रमाला चामोर्शी शहरासह लगतच्या गावातील कुणबी समाज बांधव बहुसंख्येने हजर होते.