लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा-बालमुत्यमपल्लीदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार महिन्यांपासून बंद होते. आता १० दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग व नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सदर मार्गावर रेती गिट्टीचे ढिगारे असल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे.अंकिसापासून एक किमी अंतरावर बालमुत्यमपल्ली हे गाव आहे. या गावाच्या बसस्थानक परिसरापासून राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्यावर एका बाजूला गिट्टीचे मोठमोठे ढिगारे टाकण्यात आले आहे. सदर मार्गावर चारचाकी व दुचाकी वाहनधारकांची वर्दळ असते. सदर गिट्टी आता संपूर्ण रस्त्यावर पसरल्याने आवागमनास त्रास होत आहे. दुचाकी वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंकिसा गावात गेल्या १० दिवसांपासून रस्ता व नालीचे बांधकाम सुरू आहे. येथे पाणी टाकले जात नसल्याने धुरामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराकडे प्रशासनाच्या संबंधित विभागाने लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी बालमुत्यमपल्ली, अंकिसा व आसरअल्ली या गावातील नागरिकांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर गिट्टीचे ढिगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:33 PM
सिरोंचा तालुक्यातील अंकिसा-बालमुत्यमपल्लीदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार महिन्यांपासून बंद होते. आता १० दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग व नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सदर मार्गावर रेती गिट्टीचे ढिगारे असल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे.
ठळक मुद्देअपघाताची शक्यता : महामार्ग व रस्त्याचे काम सुरू