कुणबी समाजाला जिल्हास्तरावर मोठे पद द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:42 AM2021-07-14T04:42:02+5:302021-07-14T04:42:02+5:30
३ जुलैला आरमोरी येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत कुणाचे पद काढून कुणाला देण्याची मागणी करण्यात आली नव्हती तर, देसाईगंज ...
३ जुलैला आरमोरी येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत कुणाचे पद काढून कुणाला देण्याची मागणी करण्यात आली नव्हती तर, देसाईगंज तालुक्याच्या कुणबी समाजाला जिल्हास्तरावर मोठे पद देण्यात यावे, याबाबत सर्वानुमते ठराव घेण्यात आला होता, असे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व आरमोरी विधानसभा जिल्हाप्रमुख यांच्या सूचनेनुसार देसाईगंज तालुक्यात १६ व १७ जुलैला शिवसंपर्क अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी देसाईगंज तालुका शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन कोणतेही मनभेद, मतभेद न ठेवता पक्षवाढीसाठी एकजुटीने कामाला लागण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला.
बैठकीला आरमोरी विधानसभा जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत जोशी, आरमोरी विधानसभा क्षेत्र समन्वयक गोपाल चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर मेश्राम, तालुका प्रमुख विजय सहारे, ग्रामीण तालुका प्रमुख प्रशांत किलनाके, विठ्ठल ढोरे, आनंद सिंग चावला, बालाजी ठाकरे, शहर प्रमुख देवराव बेदरे, गुरुदेव अवसरे, विजय दडमल, प्रभाकर चौधरी, त्र्यंबक भजने, जग्गी परसवानी, महेश चिंचेकर, रामचंद्र बुल्ले, श्यामराव चांदेवार, श्रीधर पाटील, दादाजी वाटकर, महेंद्र मेश्राम, दीक्षित मेश्राम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
110721\22203847img-20210711-wa0068.jpg
देसाईगंज येथील सभेत मार्गदर्शन करतांना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल.देसाईगंज तालुक्याला जिल्हास्तराव मोठे पद बहाल करण्यात यावे.