शेळीपालकांना आता जंगलात राहणार कुऱ्हाडबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 05:00 AM2021-12-30T05:00:00+5:302021-12-30T05:00:26+5:30
शेळीपालक शेळ्या चारण्यासाठी गाव शेजारी किंवा जंगलात जातात. शेळ्या एखाद्या झाडाखाली गोळा करून आंजन, बोर व इतर प्रजातींच्या वृक्षांच्या फांद्या तोडतात किंवा झाड बुंध्यापासून तोडतात. सदर झाडांची पाने शेळ्या पूर्ण न खाता पुढे निघून जातात. शेळीपालकांकडून झाडांची अनावश्यक कत्तल केली जाते. त्यामुळे गावा लगतची किंवा जंगलातील अनेक प्रजातींची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : गॅस सिलिंडर वाटपामुळे बरीच वृक्षताेड कमी झाली. परंतु शेळीपालकांकडून जंगलात माेठ्या प्रमाणात वृक्षताेड केली जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, ही अवैध वृक्षताेड टाळण्यासाठी वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी पत्र काढून शेळीपालकांसाठी जंगलात कुऱ्हाडबंदी घातली आहे. या आदेशामुळे शेळीपालकांना आता जंगलात कुऱ्हाड घेऊन जाता येणार नाही.
शेळीपालक शेळ्या चारण्यासाठी गाव शेजारी किंवा जंगलात जातात. शेळ्या एखाद्या झाडाखाली गोळा करून आंजन, बोर व इतर प्रजातींच्या वृक्षांच्या फांद्या तोडतात किंवा झाड बुंध्यापासून तोडतात. सदर झाडांची पाने शेळ्या पूर्ण न खाता पुढे निघून जातात. शेळीपालकांकडून झाडांची अनावश्यक कत्तल केली जाते. त्यामुळे गावा लगतची किंवा जंगलातील अनेक प्रजातींची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी शेळीपालकांकडून होणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता त्यांना जंगलात कुऱ्हाडबंदी घालण्यात येत असल्याची माहिती उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांनी ‘लोकमत’ला दिली. वनविभागाने आता कठाेर पावले उचलल्याने वनतस्कराचे धाबे दणाणले आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
दिवसेंदिवस वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शेळीपालकांकडून वृक्षांची ताेड हाेणार नाही, यासाठी वडसा वनविभागांतर्गत येणाऱ्या सर्व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी सूचना दिल्या आहेत. शेळीपालक जंगलात शेळ्या चारायला नेताना सोबत कुऱ्हाड नेणार नाही, यावर लक्ष ठेवण्यास त्यांना सांगितले आहे. अशातही नियमांचा उल्लंघन केल्यास वनगुन्ह्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक, वडसा