सरकारने केला सर्वांचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:20 AM2019-01-28T01:20:04+5:302019-01-28T01:23:33+5:30

साडेचार वर्षांपूर्वी भाजपच्या पुढाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासन दिले. मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. विद्यमान भाजप प्रणित सरकारने बेरोजगार युवक व शेतकऱ्यांसह सर्वांचा विश्वासघात केला, अशी टिका काँग्रेसचे माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली.

The government has betrayed everyone | सरकारने केला सर्वांचा विश्वासघात

सरकारने केला सर्वांचा विश्वासघात

googlenewsNext
ठळक मुद्देनामदेव उसेंडी यांची टीका : युवक काँग्रेसतर्फे विवेकानंदनगरात चलो वॉर्ड अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : साडेचार वर्षांपूर्वी भाजपच्या पुढाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासन दिले. मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. विद्यमान भाजप प्रणित सरकारने बेरोजगार युवक व शेतकऱ्यांसह सर्वांचा विश्वासघात केला, अशी टिका काँग्रेसचे माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मार्गदर्शनात जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने गडचिरोली शहराच्या विवेकानंदनगरात चलो वॉर्ड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाला युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, केतन रेवतकर, अजित सिंग, युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रभाकर वासेकर, पी. टी. मसराम, रामदास टिपले, विश्वजीत कोवासे, भगवान गेडाम, राकेश रत्नावार, राजू भारती, जीवन मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विवेकानंदनगरात सभा घेऊन विद्यमान सरकारच्या जनहितवादी धोरणाचा पाढा वाचण्यात आला. यावेळी नगरसेवक सतीश विधाते यांनीही मार्गदर्शन केले.
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी नागरिकांशी चर्चा करून सरकारच्या धोरणाबद्दलचे मत जाणून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाशीद शेख, गौरव आलाम, नितेश राठोड, वसंत सातपुते, निर्मला मडावी, किशोर भारती, लीला गेडाम, निकेश रत्नावार, आनंद कांबळे, देवा ढोक, प्रवीण पातर, काळू टेकाम, छाया पगाडे, गुड्डू गडमडे, सुशीला गेडाम, रोहित चंदावार, सुवर्णा गेडाम यांच्यासह बहुसंख्य नागरिक तसेच काँग्रेस, युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Web Title: The government has betrayed everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.