मूलभूत सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:32 PM2018-10-14T23:32:28+5:302018-10-14T23:33:16+5:30

रस्ता, सिंचन यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यावर शासनाचा विशेष भर आहे. मागील ७० वर्षात जेवढा निधी प्राप्त झाला नाही, त्यापेक्षाही अधिक विकास निधी आपल्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले.

The Government's emphasis on providing basic facilities | मूलभूत सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर

मूलभूत सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर

Next
ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : गडचिरोली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रस्ता, सिंचन यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यावर शासनाचा विशेष भर आहे. मागील ७० वर्षात जेवढा निधी प्राप्त झाला नाही, त्यापेक्षाही अधिक विकास निधी आपल्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले.
चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ खा. अशोक नेते यांच्या हस्ते रविवारी झाला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, नंदू काबरा, सुधाकर येनगंधलवार, प्रकाश अर्जुनवार, डी.के.मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सावली तालुक्यातील व्याहाडजवळून सुरुवात झाली. हे काम गडचिरोली जिल्ह्यातील पूलखल फाट्यापर्यंत सुरू आहे. त्यानंतर आता गडचिरोली शहरातूनही कामाला सुरुवात होणार आहे. या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते म्हणाले, आपण आमदार असतेवेळीपासून सिंचन, रस्ता, रेल्वे, वनपट्टे यासाठी पाठपुरावा केला. भाषणादरम्यानही या सुविधा मिळाव्या, यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे सांगत होतो, त्यावेळी विरोधक माझे हसे उडवत होते. मात्र आता आपल्या प्रयत्नांना यश मिळाले असून गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश राज्य मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले आहे. एवढेच नाही तर भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या लाहेरीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग पोहोचला आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय सामान्य जनतेचा विकास होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन आपण अगदी सुरुवातीपासून या बाबीसाठी लढा दिला, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले.
आ.डॉ.देवराव होळी यांनी मार्गदर्शन करताना राज्य शासन व केंद्र शासन गडचिरोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळाली आहे, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले. संचालन नगरसेवक रमेश भुरसे तर आभार सुधाकर येनगंधलवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Web Title: The Government's emphasis on providing basic facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.