ग्रामसभांचा बांबू थेट कंपनीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:50 AM2018-07-01T00:50:11+5:302018-07-01T00:52:45+5:30
पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभांमार्फत बांबूची तोडणी करून कंत्राटदारांना दिले जात होते. परंतु मागील तीन वर्षांपासून ग्रामसभा बांबू तोडून त्याचा थेट पुरवठा संबंधित कंपनीला करीत आहेत. टनप्रमाणे बांबूची विक्री होत असल्याने ग्रामसभा मालामाल झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाहेरी : पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभांमार्फत बांबूची तोडणी करून कंत्राटदारांना दिले जात होते. परंतु मागील तीन वर्षांपासून ग्रामसभा बांबू तोडून त्याचा थेट पुरवठा संबंधित कंपनीला करीत आहेत. टनप्रमाणे बांबूची विक्री होत असल्याने ग्रामसभा मालामाल झाल्या आहेत. सध्या ग्रामसभांना एका बंडलवर पूर्वीच्या १८ रूपयांऐवजी ९० रूपये मिळत आहेत.
अनेक वर्षांपासून पेपर मिल कंपन्यांकडून बांबूची तोडणी मजुरांकरवी केली जात होती. येथील लोकांना रोजगार मिळत होता. परंतु पेसा व वनहक्क कायद्यामुळे ग्रामसभांना ९० रूपये प्रतिबंडल एवढा भाव मिळत असल्याने मागील तीन वर्षांपासून ग्रामसभाच बांबूची विक्री थेट कंपनीला करीत आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप दिसून येत नाही.
तालुक्यातील कोयर, आलदंडी, हितापाडी, कृष्णार, कोस्फुंडी, तिरकामेटा, कोडके व कोठी आदी ग्रामसभांनी कंत्राटदारांना बांबू विकला. कुचेर ग्रामसभेने मात्र वजनाप्रमाणे बांबूविक्री करण्याचा निर्णय घेतला. ग्रामसभांच्या पुढाकाराने बांबू विक्री केली जात आहे. सध्या दोन मीटरचा बांबूचा तुकडा पाडून बंडल तयार केले जात आहे.