विकासासाठी पालकत्व स्वीकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:10 AM2019-07-13T00:10:34+5:302019-07-13T00:11:27+5:30
मागास हा लागलेला डाग पुसून विकासात इतर जिल्ह्यांच्या श्रेणीत गडचिरोली जिल्ह्याला नेण्यासाठी पालकत्व स्वीकारले. त्यादृष्टीने आपण प्रयत्न करू. मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या हाताला काम देणे हे आपले मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन वित्त तथा वनमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : मागास हा लागलेला डाग पुसून विकासात इतर जिल्ह्यांच्या श्रेणीत गडचिरोली जिल्ह्याला नेण्यासाठी पालकत्व स्वीकारले. त्यादृष्टीने आपण प्रयत्न करू. मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या हाताला काम देणे हे आपले मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन वित्त तथा वनमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर मुनगंटीवार यांचा गडचिरोली जिल्ह्यातील पहिलाच दौरा शुक्रवारी झाला. यानिमित्त चामोर्शी येथील सांस्कृतिक भवनात त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, चामोर्शीच्या नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, तालुका महामंत्री विनोद गौरकर, भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, प्रकाश गेडाम, सभापती आनंद भांडेकर, जि.प. सदस्य विद्या आभारे, उपसभापती आकुली बिश्वास, तहसीलदार संजय गंगथडे, संवर्ग विकास अधिकारी नितेश माने, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अमित यासलवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधी, नगर पंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी, प्राथमिक शिक्षक संघ, व्यापारी संघटना, आर्यवैष्य समाज, पद्मशाली समाज, आरपीआय आठवले गट, वरटी, परीठ, धोबी संघटना, पेसा संघटना तसेच विविध समाज संघटनांच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम, गटनेता प्रशांत एगलोपवार, विजय शात्तलवार, विजय गेडाम, रोशनी वरघंटे, कविता किरमे, सुनिता धोडरे, नरेश अलसावार, निरंजन रामानुजमवार, जयराम चलाख, साईनाथ बुरांडे, रेवनाथ कुसराम, सुरेश नगराळे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, झाडीतील शुक्राचार्य संपला असून त्यांचे नातेवाईक जीवंत आहेत. जिल्ह्याची जनता सात्विक आहे. विकासासाठी आपण पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देऊ. चामोर्शी शहराच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. शहरात रस्ते, स्टेडियम, बसस्थानकाचे काम पूर्ण करू. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले.
संचालन जि.प. सदस्य प्रा. रमेश बारसागडे, प्रास्ताविक आमदार डॉ. देवराव होळी तर आभार भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख यांनी मानले.
मार्कंडेश्वर मंदिराच्या कामाला गती देणार
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर हे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे श्रध्दास्थान आहे. मार्कंडेश्वराचे मंदिर अतिशय पुरातन आहे. येथील दगडांवर कोरलेली कला त्या काळातील संपन्नतेची साक्ष देते. मात्र यापूर्वीच्या सरकारने मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे मंदिराची पडझड झाली. मार्कंडेश्वर मंदिराच्या कामाला गती दिली जाईल. जीर्णोध्दारासाठी जेवढा निधी आवश्यक आहे, तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले. चामोर्शी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी प्रत्यक्ष मार्र्कंडाला भेट देऊन मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी मार्कंडेश्वर मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली.
यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह श्री मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामाजी तिवाडे, भाजपा ज्येष्ठ नेते प्र.सो. गुंडावार, विठोबा लटारे, विजय कोमेरवार, मनोहर पालारपवार आदी उपस्थित होते.