शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

सिराेंचा शहरात पाळीव डुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:55 AM

भामरागड तालुक्यात लाईनमन द्या भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे ...

भामरागड तालुक्यात लाईनमन द्या

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु, अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.

नागाेबा देवस्थान दुर्लक्षित

गडचिरोली : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगावपासून दोन किमी अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागोबा देवस्थानात दरवर्षी रथसप्तमीनिमित्त मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, येथे निवास, पाणी व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.

विश्रामगृहाची मागणी प्रलंबितच

कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. या विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे. या ठिकाणी विश्रामगृह बांधल्यास या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सोयीचे होणार आहे.

पट्टे वाटपासाठी अट शिथिल करा

गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. या अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.

पर्यटनस्थळांचा विकास रखडला

कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध सौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी अनेक पर्यटनस्थळे आहेत; पण त्या ठिकाणी अजूनपर्यंत सोयीसुविधा नाहीत. या पर्यटनस्थळांचा विकास केल्यास पर्यटकांची गैरसोय होणार नाही. पर्यटनस्थळे असतानाही केवळ शासनाची मान्यता व निधी मिळत नसल्याने त्यांची वाताहत आहे.

याेजनांबाबत जनजागृतीचा अभाव

कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.

गाळ उपशाअभावी नाल्या तुंबल्या

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर देण्याची मागणी आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी जमा झाले होते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला. सध्या नाल्या तुंबल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे गाळाचा उपसा करावा, अशी मागणी हाेत आहे.

मका लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग

गडचिरोली : रब्बी हंगामातील हमखास व अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून मक्याला ओळखले जाते. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात मका लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सध्या अनेक शेतकरी बियाण्यांची खरेदी करून मक्याची लागवड करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.

कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा

गडचिरोली : आदिवासीबहूल जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविली जात होती. आता मात्र या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. या योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.

दुर्गम भागात कर्मचारी राहतच नाही

धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करीत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहतच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहत नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.

निस्तार डेपोअभावी नागरिक त्रस्त

कुरखेडा : अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावांत निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, कुरखेडा येथे निस्तार डेपो नाही.

चपराळा येथे सोयीसुविधा पुरवा

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र, याठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे. चपराळा येथे भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वाढली आहे.

पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यावर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र, या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा

गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार

गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत.