लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : केंद्र व राज्यातील सरकार श्रीमंतांचे बाहुले बनले असून ‘आम्ही म्हणू तो कायदा’ अशी मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांमध्ये असुरक्षितता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारला आपली ताकद दाखविणे आवश्यक आहे. सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी प्रत्येकाने सजग असावे, असे प्रतिपादन माजी आमदार अॅड.जयदेव गायकवाड यांनी केले.अहेरी येथे गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाला राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राकाँ महिला जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शाहीन हकीम, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पंडितराव कांबळे, हाजीप नजमोद्दीन खान, माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम, अहेरी तालुकाध्यक्ष जहीर हकीम, सुखदेव दुर्योधन आदी उपस्थित होते.संचालन सुरेंद्र अलोणे तर आभार जहीर हकीम यांनी मानले. यशस्वीतेसाठी महेश अलोणे, कपिल ढोलगे, संदीप कांबळे, आतिश गुरनुले, मारोती आत्राम, अमोल मुक्कावार, श्रीनिवार विरगोनवार, नितीन दोंतुलवार, नागे मडावी, अमोल अलोणे, सतीश कावळे, विलास मेश्राम, प्रणय अलोणे, उज्ज्वल नैताम, परशुराम दहागावकर, राहुल पेंढारकर, सुमित मोतकुलवार, मखमूर शेख, सोमाजी झाडे, अविनाश रामटेके यांनी सहकार्य केले. मेळाव्याला अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सरकार बनले श्रीमंतांचे बाहुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 1:14 AM
केंद्र व राज्यातील सरकार श्रीमंतांचे बाहुले बनले असून ‘आम्ही म्हणू तो कायदा’ अशी मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांमध्ये असुरक्षितता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देजयदेव गायकवाड यांची टीका : अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा