व्यापारी, छाेटे-माेठे व्यावसायिक, नाेकरदार, शेतकरी, शेतमजूर यांना काेराेनाचा चांगलाच फटका बसला आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. परिणामी सर्व शाळा, महाविद्यालये लाॅकडाऊन झाले. याचा फटका विद्यार्थ्यांना बसून त्याचा परिणाम शिक्षणावर झाला. नाेव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नववी ते बारावी आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सहावी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले हाेते. मात्र काेराेनाने पुन्हा डाेके वर काढले. परिणामी शाळा पुन्हा बंद झाल्या. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण हाती घेण्यात आले आहे. याला विद्यार्थी व पालकांकडून शहरी भागात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू लागला. मात्र ऑनलाइन शिक्षणामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले. लिहिण्याची गतीही कमी झाल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स .....
विद्यार्थ्यांनाे हे करा.....
१) माेबाइलमध्ये अधिकाधिक वेळ गुंतून राहिल्याने ताणतणाव निर्माण हाेताे. त्यासाठी ऑनलाइन अभ्यास झाल्यानंतर सुंदर-सुंदर गाेष्टींचे व सामान्य ज्ञान असलेल्या पुस्तकाचे वाचन करावे. त्यानंतर शुद्धलेखनाचा सराव करावा.
२) लक्ष केंद्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्यान करावे. त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल आणि हस्ताक्षरही चांगले हाेतील.
३) विद्यार्थ्याने वेळेचा अपव्यय न करता मिळालेल्या वेळेचा सदुपयाेग करावा. नियमित लेखन, सराव आवश्यक आहे. ताे केल्यास विद्यार्थ्यांच्या लेखनाची गती वाढेल.
काेट ......
मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात
माेबाइलमधून दिलेले प्रश्न साेडविण्याकरिता विद्यार्थ्यांना वारंवार थांबावे लागते. त्यामुळे त्यांच्या लेखनाची गती कमी झाली आहे. शाळा सुरू असताना शिक्षकांनी सांगितलेले मुद्दे विद्यार्थी पटापट वहीत लिहून घ्यायचे. मात्र आता त्यांच्या लेखनाची सवय तुटली आहे. त्यामुळे त्यांचा तणाव वाढला आहे. यावर उपाययाेजना म्हणून शुद्धलेखनाचा सराव आवश्यक आहे. - करमचंद भाेयर, शिक्षक
काेट ....
आता अभ्यासात खंड पडला आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी नियमित लिहिण्याचा सराव विद्यार्थ्यांनी करायलाच हवा. त्यासाठी बेसिक स्ट्राेकची सराव करावा. वाचन हा विषय गंभीर आहे. लाॅकडाऊनमध्ये लहान मुलांचा वाचन करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांनी मुला-मुलींना दरराेज लिखानाची सवय लावावी.
- विलास म्हस्के, शिक्षक
काेट ...
काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद झाल्या. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. ऑनलाइन शिक्षण झाल्यावर प्राप्त झालेले प्रश्न विद्यार्थी साेडवितात. माेबाइलमध्ये पाहून लिहीत असल्याने त्यांना खूप वेळ लागताे. पूर्वीपेक्षा त्यांचे अक्षरही आता बिघडले असल्याचे दिसून येत आहे.
- ममता बाेरकुटे, पालक
काेट ...
काेराेनामुळे शाळा बंद झाल्या. माेबाइलच्या माध्यमातून शिक्षण सुरू असल्याने स्माॅर्टफाेन उपलब्ध करून दिला. आता माझा मुलगा सतत माेबाइलवर व्यस्त असताे. ऑनलाइन क्लास सुरू झाला आहे, असे सांगताे. माेबाइलमध्ये पाहून ते वहीत लिहिताे. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत नाही. ताणतणाव दिसताे. काही मुलांना डाेळ्यांचे विकारही जडत असल्याचे दिसून येत आहे. काेराेना लाॅकडाऊनच्या काळात ही विद्यार्थ्यांना नंबरचा चष्माही लागला आहे. - अनिल वाघरे, पालक