आराेग्य तपासणी शिबिराला पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अपर पाेलीस अधीक्षक समीर शेख, पंचायत समिती सभापती माराेतराव इचाेडकर, गटविकास अधिकारी मुकेश माहाेर, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. सुनील मडावी, उमेदच्या जिल्हा समन्वयक चेतना लाटकर, पाेलीस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. मिलिंद रामटेके, नवेगावचे सरपंच दशरथ चांदेकर, उपसरपंच राजू खंगार, उपस्थित हाेते. आराेग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह, यासह विविध आजाराची तपासणी करण्यात आली. आत्मसमर्पितांचे आराेग्य सुदृढ राहावे. त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी हे आराेग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी पाेलीस दलाच्या वतीने आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना निवासाची, विद्युतीकरणाची सुविधा दिली जाईल. तसेच त्यांना राेजगाराची संधी उपलब्ध केली जाईल. आराेग्य, शिक्षण, पाणी व रस्त्यांची साेय उपल्बध केली जाईल, असे सांगितले. आराेग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पाेलीस उपनिरीक्षक गंगाधर ढगे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
वसाहतीच्या विकासासाठी आठ समित्या
आत्मसमर्पित सदस्यांना राहण्याची सुविधा, वीज पुरवठा, पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहीर, हातपंप, व्यावसायिक प्रशिक्षण, तसेच बचत गटांना शासनाच्या विविध याेजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, खेळाचे मैदान, शेतीसाठी जागा, प्राथमिक आराेग्य केंद्र, मुलांच्या शिक्षणाची साेय आराेग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, शिक्षण, मूलभूत सुविधा, काैशल्य व राेजगार, तंटामुक्त समिती, वसाहत सुरक्षा दल, देखरेख व सुशाेभीकरण अशा आठ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रत्येक महिन्यातून एकदा या समित्यांचा आढावा पाेलीस विभाच्या वतीने घेतला जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.