आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:34 AM2018-09-26T01:34:20+5:302018-09-26T01:34:55+5:30

नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन स्वत:चे शरीर सुदृढ ठेवावे, देशाची सेवा करण्यासाठी शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. आरोग्य हिच माणसाची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.

Health is the real wealth of man | आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती

आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती

Next
ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : चामोर्शीतील हृदय व रोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन स्वत:चे शरीर सुदृढ ठेवावे, देशाची सेवा करण्यासाठी शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. आरोग्य हिच माणसाची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.
संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा चामोर्शीच्या वतीने शनिवारी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत हृदय व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पुरूषोत्तम अरोरा होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आ. डॉ. देवराव होळी, संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज किसन नागदेवे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, डॉ. महेश खोत, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, जि. प. सदस्य दिलीप बारसागडे, चामोर्शीच्या नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, उपाध्यक्ष राहूल नैैताम, आनंद गण्यारपवार, शाळेचे मुख्याध्यापक मारडकर, बोरकुटे आदी उपस्थित होते.
नागरिकांनी शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले. आ. डॉ. देवराव होळी म्हणाले, संत निरंकारी मंडळातर्फे विविध उपक्रमाद्वारे खरी मानवसेवा केली जात आहे. मानवसेवा हिच ईश्वरसेवा आहे, असे सांगितले.
याप्रसंंगी जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी संत निरंकारी मंडळाचा हा स्तुत्य उपक्रम समाजाला दिशा देणारा आहे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी मंडळ सेवा दलाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. या रोगनिदान शिबिरात चामोर्शी शहरासह परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उपस्थित डॉक्टरांनी आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी तसेच विविध रोगांची लक्षणे आदींबाबत माहिती दिली.
यापूर्वी संत निरंकारी मंडळाच्या वतीने गडचिरोली व देसाईगंज येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी दोन्ही मिळून २०० वर युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.

Web Title: Health is the real wealth of man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.