बाॅक्स
वाहनाला जीपीएस सदृश यंत्र
ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असता जंगलात काही अंतरावर गाडी आपोआप बंद पडली आणि गाडी सुरूच नव्हती होत, गाडी दुरुस्तीसाठी शेवटी मेकॅनिक बोलविण्यात आला. अनेक प्रयत्न करून गाडी सुरू होत नव्हती. गाडीत जीपीएस यंत्रसारखे काही लावलेले दिसले. जेव्हा ते गाडीतून वेगळे केले तेव्हा कुठे गाडी सुरू झाली. अवैध दारू विक्रेता छुप्या मार्गाने दारू नेण्यासाठी आता टेक्नॉलाजीचा पण वापर करू लागले असून, ते जीपीएससदृश वस्तू नेमकी काय आहे हे तपासण्यासाठी सायबर क्राईम आणि फारेंसिक लॅबची मदत घेणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी सांगितले.
160821\1724-img-20210816-wa0031.jpg
अहेरी चे पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी पकडली गाडी सहित 28 लाख 6 हजार रुपयांची दारू