गडचिराेलीवरून अहेरीकडे तसेच गाेंडपिपरीमार्गे दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. आष्टी येथील मुख्य चाैकातूनच वाहने जात असतात. आधीच अरुंद असलेल्या चाैकात अवजड वाहनांमुळे वाहतुकीची काेंडी हाेते. वळताना मागे येणाऱ्या वाहनधारकांना धाेका हाेण्याची शक्यता असते. अपघाताचा धोका ओळखून या मार्गाचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्याची गरज हाेती. परंतु येथून डांबरीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्गाने दिवसभर ट्रेलर व जड वाहनांची वर्दळ असते. तसेच मुख्य चौक असल्याने या ठिकाणी सायंकाळी बरीच गर्दी असते. बरेचदा पुतळ्याच्या संरक्षक भिंतीला वाहनांनी धडक दिलेली आहे. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून चौकातील रुंदीकरण करण्याची नितांत गरज आहे. परंतु वाहनांच्या गतीवरील नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बरीच जड वाहने दुकानाच्या समोर उभी असतात. त्यामुळे वाहतुकीस अडसर येताे. सध्या आलापल्लीमार्गे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. परंतु सदर काम संथ गतीने सुरू आहे. केवळ गिट्टी टाकून ठेवली आहे. नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे श्वसनाचेही आजार बळवण्याची शक्यता आहे.
आष्टीतील महामार्गाचे काम संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:35 AM