रुग्णालयातील जनरेटर नादुरूस्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:47 PM2018-08-18T23:47:10+5:302018-08-18T23:47:38+5:30
स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात मागील वर्षभरापासून जनरेटरची सुविधा नाही. या रुग्णालयातील जनरेटर वर्षभरापासून नादुरूस्त स्थितीत पडून आहे. १५ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात मागील वर्षभरापासून जनरेटरची सुविधा नाही. या रुग्णालयातील जनरेटर वर्षभरापासून नादुरूस्त स्थितीत पडून आहे. १५ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला. जनरेटरसह अनेक समस्या या रूग्णालयात कायम आहेत.
पावसाळा असल्याने रूग्णालय परिसरात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशा स्थितीत दिवसा व रात्री २४ तास पंखे सुरू असणे आवश्यक आहे. मात्र कुरखेडा येथील वीज पुरवठा अधूनमधून खंडीत होत असल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. येथील जनरेटर नादुरूस्त स्थितीत आहे. मात्र दुरूस्तीकडे रूग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रूग्णालयाच्या बऱ्याच वार्डातील शौचालय घाणीच्या विळख्यात सापडले आहे. काही शौचालय मागील वर्षभरापासून कुलूपबंद आहे. काही शौचालयाचे दार तुटलेले आहे. सदर रूग्णालयात औषधांचा नेहमीच तुटवडा जाणवत असतो. येथील काही अधिकारी व कर्मचारी रजेवर असल्याने रूग्णांना वेळेवर औषधोपचार मिळत नाही. या रूग्णालयाची आरोग्य सेवा प्रभावित झाली असूनही आरोग्य विभागाचे अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. येथील समस्या तत्काळ मार्गी लावण्याची मागणी रूग्णांनी केली आहे. या रूग्णालयात तालुकाभरातून अनेक रूग्ण दररोज औषधोपचारासाठी येतात. काही रूग्ण भरती होतात. मात्र येथे डॉक्टर व कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने सेवेवर परिणाम होत आहे.
भोजन वाटपात विलंब
रूग्णालयातील वीज पुरवठा खंडीत झाल्यावर विजेचे कारण सांगत रात्री १० ते ११ वाजेपर्यंत उशीरा रूग्णांना भोजनाचे वाटप केले जाते. जनरेटर कक्षाची दुरवस्था आहे. सदर कक्षाचे दार नेहमी बंदच असते. जनरेटर आज-उद्या दुरूस्त करू, असे सांगत अधिकाºयांकडून वेळ मारून नेली जात आहे. असुविधेमुळे रूग्ण त्रस्त आहेत.
कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आपण रूजू झाल्यानंतर येथील विविध समस्या अवगत करून घेतल्या. येथील जनरेटर नादुरूस्त स्थितीत आहे. सदर जनरेटरची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आपण जिल्हा स्तरावरील अधिकाºयांकडे केली आहे. दुरूस्तीसाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.
- व्येंकटेश धवन,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा