लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: छत्तीसगढ़ राज्यासह लगत असलेल्या कोरची तालुक्यात मिठाचा कथित तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरली आणि मंगळवारी दिवसभर नागरिकांनी बाजारात मिठाच्या खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळे बाजारात दुपारी १२ वाजेपर्यतच जवळपास सर्वच विक्रेत्यांकडील मिठाचा साठा संपून त्याची टंचाई निर्माण झाली होती.येथील बाजारपेठेत काल सोमवारपर्यत सर्वच प्रमूख विक्रेत्याकडे आवश्यक प्रमाणात मिठाचा साठा उपलब्ध असताना छत्तीसगढ़ व कोरची परिसरातून संबंधित कारखान्यातून मिठाचा पुरवठा ठप्प होत असल्यो बाजारात मीठ उपलब्धराहणार नाही अशी अफवा गावागावात पसरली. त्यामुळे ग्रामीण भागातून मीठ खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. या संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी मिठाच्या किंमतीही वाढविल्या. पाहता पाहता सर्व विक्रेत्यांकडील मिठाचा साठा संपला. नागरिकांमध्ये त्यामुळे बरीच घबराटही पसरली. नगरपंचायतीच्या वतीने लाऊडस्पीकरवरून नागरिकांना मिठाची खरेदी न करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच विक्रेत्यांनी छापील दराहून अधिक रक्कम न आकारण्याबाबत सूचना करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडामध्ये मीठ खरेदीसाठी उडाली प्रचंड झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 7:11 PM
छत्तीसगढ़ राज्यासह लगत असलेल्या कोरची तालुक्यात मिठाचा कथित तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरली आणि मंगळवारी दिवसभर नागरिकांनी बाजारात मिठाच्या खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळे बाजारात दुपारी १२ वाजेपर्यतच जवळपास सर्वच विक्रेत्यांकडील मिठाचा साठा संपून त्याची टंचाई निर्माण झाली होती.
ठळक मुद्देमिठाचा तुटवडा असल्याची अफवा