जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह मुक्तिपथची बैठक झाली होती. त्यामध्ये ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला. त्या अनुषंगाने अहेरी उपविभागीय स्तरावर बैठकीचे आयोजन करून अवैध दारू व तंबाखूविरोधात कारवाई करण्यासाठी चर्चा करण्यात आली. या वेळी त्रासदायक गावांची यादी तयार करण्यात आली. पोलीस स्टेशनला अवैध दारूच्या तक्रारी १५ दिवसांत निकाली काढणे, दर महिन्याला तालुका पोलीस अधिकारी, पोलीस बिट अंमलदार, पोलीस पाटील, मुक्तिपथ तालुका संघटक यांची बैठक होणे गरजेचे आहे. ज्या गावात किंवा वाॅर्डात रेड करणे आहे, त्या गावातील पोलीस पाटील यांनी अवैध दारूविक्रेत्यांची माहिती देणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस पाटील यांना प्रशिक्षण देणे, ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह कायद्याची अंमलबजावणी करणे, १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे, दर दोन महिन्यांतून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन तालुक्यात आलेल्या अडचणींवर चर्चा करून निर्णय घेणे. आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण, जिमलगट्टा पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक देवानंद बगमारे उपस्थित होते.
अवैध दारू, तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:34 AM