सिमेंट रस्त्यासाठी हाेताेय अवैधरीत्या रेतीचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:41 AM2021-08-17T04:41:58+5:302021-08-17T04:41:58+5:30
यापूर्वी जिल्हा वार्षिक निधी अंतर्गत २६ लाख ५० हजार रुपये खर्च करून १०० मीटर नालीचे बांधकाम करण्यात आले. ...
यापूर्वी जिल्हा वार्षिक निधी अंतर्गत २६ लाख ५० हजार रुपये खर्च करून १०० मीटर नालीचे बांधकाम करण्यात आले. ग्रामपंचायत चौक ते गुलाब दरडमारे यांच्या घरापर्यंत अंदाजे तीनशे मीटर पेक्षा अधिक लांबीचा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. त्यासाठी अंदाजे ५० ते ७५ ट्रॅक्टर रेतीचा उपसा करून ती कामात वापरण्यात आली. नागरिकांच्या लक्षात येऊ नये म्हणून पाच-दहा ब्रास रॉयल्टीची रेती वापरून बाकी अवैध रेतीचा वापर या कामासाठी करण्यात आला. मात्र याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात काही रेती घाटाचा लिलाव झाला असताना देखील रेती तस्करी सुरू आहे. परिणामी शासनाचा महसूल बुडत आहे. तसेच या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या रस्त्याचे ज्यांच्याकडे काम आहे त्या संबंधित यंत्रणेचे अधिकारी या कामाकडे फिरून देखील पाहत नाही. सिमेंट रस्ता तयार करताना प्रथम रस्ता खोदून त्यावर ८ इंच बोर्डर १५ सेंमी मास काँक्रेट दहा सेंटिमीटर कोटिंग केल्या जाते. पण या कामात अशा कोणत्याही तांत्रिक कामाचा वापर करण्यात आला नाही. सिमेंट रस्त्याचे काम अकुशल कामगारांकडून केल्या जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या कामाकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
140821\4225img_20210814_143357.jpg
ट्रॅक्टर द्वारा आणलेले अवैद्य रेती