गडचिराेली : राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक इंडियन रेल्वे संघाने, द्वितीय क्रमांक आंध्र प्रदेश ,तृतीय क्रमांक तामिळनाडू, चतुर्थ क्रमांक कर्नाटका तर महिला गटात प्रथम क्रमांक कर्नाटका, द्वितीय क्रमांक तामिळनाडू तृतीय क्रमांक केरला तर चतुर्थ क्रमांक आंध्रप्रदेश संघाने पटकावला.
बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, दी महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन व बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १० जानेवारी दरम्यान ६९ वी वरिष्ठ राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या जवळपास ३० तर महिलांच्या २६ संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत देशातील विविध भागातील राज्यांनी उदाहरणार्थ जम्मू-काश्मीर, लडाख, कर्नाटका, तामिळनाडू, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्याच्या संघांनी सहभाग नोंदविला.
१० जानेवारी राेजी आयाेजित बक्षिस वितरण समारंभास प्रमुख बक्षीस वितरक म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम उपस्थित होत्या. अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. प्रशांत जाकी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव वाय. राजाराव, विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ. अनिता लोखंडे, प्रिया रोहनकर, डी. एस. गोसावी, रूपाली पापडकर, मंगेश राऊत तसेच बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाचे सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डबल मेन्स क्रीडा प्रकारातील विजेतेडबल मेन्स या क्रीडा प्रकारात पुरुष गटात प्रथम क्रमांक तामिळनाडू, द्वितीय केरला, तृतीय कर्नाटका, चतुर्थ आंध्र प्रदेश. महिला विभागात प्रथम क्रमांक कर्नाटका, द्वितीय क्रमांक तामिळनाडू, तृतीय क्रमांक बिहार, चतुर्थ क्रमांक आंध्र प्रदेश संघाने तर मिक्स डबल या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक तामिळनाडू, द्वितीय क्रमांक आंध्रप्रदेश, तृतीय क्रमांक केरला चतुर्थ क्रमांक कर्नाटक या संघाने पटकावला.
वैयक्तीक बक्षिसाचे मानकरीया बक्षीस वितरण समारंभ दरम्यान बेस्ट अपकमिंग प्लेयर म्हणून गडचिरोली जिल्ह्याचा खेळाडू पंकज राठोड, बिहार संघाचा दीपक प्रकाश, वेस्ट बंगाल संघाचा मांयकल मंडल, दिल्ली संघाचा राहुल प्रसाद ,छत्तीसगड संघाचा गौरव तिवारी तर महिला विभागात राजस्थान संघाची सलोनी, बिहार संघाची वंदना कुमारी ,छत्तीसगड संघाची शगुन सिंग, महाराष्ट्र संघाची हर्षदा मोरे, हरियाणा संघाची जानवी यांना गौरवण्यात आले. स्टार ऑफ इंडिया या विशेष पुरस्काराने इंडियन रेल्वे संघाचा डी वेंकटेश गणेश, आंध्रप्रदेश संघाचे रुपेंद्र, इंडियन रेल्वे संघाचा एन कलाई सैलवान, तामिळनाडू संघाचा गणेश कुमार, तर महिला विभागात कर्नाटका संघाची सहाना, तामिळनाडू संघाची मालिनी, कर्नाटका संघाची पल्लवी, आंध्र प्रदेश संघाची काव्यश्री, केरळ संघाची जोशना जॉन यांना गौरवण्यात आले.