सेवेनुसार अंगणवाडी महिलांच्या मानधनात वाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:24 AM2021-06-29T04:24:58+5:302021-06-29T04:24:58+5:30
अंगणवाडी महिलांचा मेळावा छाया चन्नावार यांच्या अध्यक्षतखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बाेलत हाेते. यावेळी प्रामुख्याने छबिता ...
अंगणवाडी महिलांचा मेळावा छाया चन्नावार यांच्या अध्यक्षतखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बाेलत हाेते. यावेळी प्रामुख्याने छबिता उरवते, वेणू दुधबावरे, अनिता मेश्राम, ताई नेवारे, मंगला चांदेकर, मीरा तिम्मा, मंजुषा बावणे आदी उपस्थित हाेते. पुढे बाेलताना प्रा.दहिवडे म्हणाले, १० वर्ष, २० वर्ष व ३० वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केलेल्या अंगणवाडी सेविकास व मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, ही वाढ अजूनही देण्यात आली नाही. पाेषण ट्रॅकर ॲपमध्ये इंग्रजीतून माहिती भरण्याचे आदेश शासनाने काढले आहे. मात्र, बऱ्याच अंगणवाडी महिला अल्पशिक्षित असल्याने इंग्रजीतून माहिती भरण्याची सक्ती त्यांना करू नये, असे दहिवडे यावेळी म्हणाले.
या अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस सेवा निवृत्त झाल्या अशांना सेवानिवृत्तीचा लाभ अजूनही मिळाला नाही. जे अंगणवाडी केंद्र भाड्याच्या खाेलीत आहेत त्यांना भाड्याचे पैसे मिळाले नाही. गेल्या तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे टीए बिल प्रलंबित आहे, असे छाया चन्नावार यांनी सांगितले.
मेळाव्याचे प्रास्ताविक ऊर्मिला गव्हारे यांनी केले तर आभार विमल येनगंटीवार यांनी मानले.