देशाच्या जडणघडणीत इंदिराजींचे मोलाचे योगदान

By Admin | Published: November 1, 2014 01:03 AM2014-11-01T01:03:07+5:302014-11-01T01:03:07+5:30

भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन तसेच कल्याणकारी योजना राबवून देशाच्या विकासाला गती दिली.

Indiraji contributed significantly in the formation of the country | देशाच्या जडणघडणीत इंदिराजींचे मोलाचे योगदान

देशाच्या जडणघडणीत इंदिराजींचे मोलाचे योगदान

Next

गडचिरोली : भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन तसेच कल्याणकारी योजना राबवून देशाच्या विकासाला गती दिली. भारत देशाच्या जडणघडणीत इंदिरा गांधी यांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.
स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. उसेंडी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हसनअली गिलानी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला काँग्रेसचे गडचिरोली तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, पंचायत समिती सभापती देवेंद्र भांडेकर, महासचिव समशेर खॉ पठाण, सुनिल वडेट्टीवार, के. एस. भडके, सी. बी. आवळे, पांडुरंग घोटेकर, सुनिल खोब्रागडे, राकेश रत्नावार, तुळशिराम भोयर, किशोर चापले, नंदू वाईलकर, सतिश विधाते, बाबुराव बावणे, अ‍ॅड. अशोक चलाख, पी. टी. मसराम, वसंता राऊत, विजय भांडेकर, आर. एल. मेश्राम, महादेव भोयर, पियुष मडावी, अमिता मडावी, प्रतिभा जुमनाके, लता ढोक आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनीच इंदिरा गांधींना आदरांजली वाहीली. संचालन सोनटक्के यांनी केले तर आभार सुनिल खोब्रागडे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Indiraji contributed significantly in the formation of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.