लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील कन्नमवार नगर वॉर्ड क्र.१७ मध्ये रिलायन्स टॉवर आहे. मात्र या टॉवरच्या सभोवताल प्रचंड पाणीसाठा असून दलदल आहे. या ठिकाणी बाराही महिने पाणी साचूून राहते. त्यामुळे सदर टॉवर हा के व्हाही कोसळून हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.कन्नमवार नगरात रिलायन्स कंपनीचे टॉवर आहे. या टॉवरलगत वेगवेगळे दोन ले-आऊट आहेत. या ले-आऊटलगत ओपन स्पेस असून आजूबाजूला घरांची वस्ती आहे. कन्नमवार नगराच्या घरातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी याच टॉवर खालून जात असते. रिलायन्स पेट्रोलपंपापासून मोठी नाली बांधून ती अलिकडच्या मार्गाच्या मोठ्या नालीला जोडणे आवश्यक आहे. रिलायन्स कंपनीच्या टॉवरजवळ पाईप टाकून भूमिगत नाली करता येणे शक्य आहे. टॉवरजवळून भूमिगत नाली करून लगतचे ओपन स्पेस विकसित केल्यास या भागात घाणीचे साम्राज्य राहणार नाही. सदर टॉवर हटवून येथील ओपन स्पेसला विकसित करून त्याचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिक करीत आहेत. मात्र या मागणीकडे सुद्धा पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.टॉवर हटवून लोकवस्तीच्या बाहेर द्या, नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदनकन्नमवार नगर वॉर्ड क्र.१७ येथे धोकादायक रिलायन्स टॉवर आहे. सदर टॉवरच्या सभोवताल पाणीसाठा आहे. त्यामुळे टॉवरचे खांब कमजोर होऊन तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर टॉवर हा येथून कायमचा हटवून लोकवस्तीच्या बाहेर हलविण्यात यावा, अशी मागणी कन्नमवार नगरातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात नागरिकांनी पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रतीलिपी नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक सतीश विधाते यांना पाठविले आहे. निवेदन देताना चंदू रामटेके, राजेंद्र आदे, दिवाकर भडके, विजय गिरसावडे, किशोर वडेट्टीवार, दिलीप आष्टेकर, राजेंद्र जुमनाके, रोशन आखाडे आदी उपस्थित होते. टॉवर सभोवतालचा परिसरातील घाण स्वच्छ करून येथे चबुतरा बांधावा. टॉवरजवळ नाली तयार करून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी. नागोबा मंदिर ते उरकुडे कॉन्व्हेंटपर्यंत नालीचे बांधकाम करावे. या परिसरात सिमेंट काँक्रिटच्या खुर्च्या लावून ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करावे. आष्टेकर यांच्या घराच्या मधून जाणारा रस्ता तयार करून नाली बांधावी आदी मागण्यांचा समावेश आहे.डुकरांचा हैदोस व डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्तसदर टॉवरच्या परिसरात घाण पाण्याचे डबके तयार झाले असून येथे कचरा वाढला आहे. या ठिकाणी डुकरांचा हैदोस राहत असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून नजीक घरे असलेल्या कुटुंबांना त्रास सहन करावा लागत आहे. कन्नमवार नगरात शिक्षक निशाने यांच्या घरासमोर चांगल्या पद्धतीचे ओपन स्पेस तयार झाले आहे. मात्र या ओपन स्पेसच्या भागात टॉवर असलेल्या या भागातून पावसाळ्यात पाण्याचा मोठा लोंढा येतो. त्यामुळे टॉवर असलेल्या परिसराची स्वच्छता करून सदर टॉवर दुसरीकडे हलविणे आवश्यक आहे.
‘तो’ धोकादायक टॉवर कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 5:00 AM
कन्नमवार नगरात रिलायन्स कंपनीचे टॉवर आहे. या टॉवरलगत वेगवेगळे दोन ले-आऊट आहेत. या ले-आऊटलगत ओपन स्पेस असून आजूबाजूला घरांची वस्ती आहे. कन्नमवार नगराच्या घरातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी याच टॉवर खालून जात असते. रिलायन्स पेट्रोलपंपापासून मोठी नाली बांधून ती अलिकडच्या मार्गाच्या मोठ्या नालीला जोडणे आवश्यक आहे.
ठळक मुद्देकन्नमवार नगरातील समस्या : दलदल व पाणी साठ्यामध्ये उभा आहे टॉवर