रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:35 PM2019-09-02T23:35:08+5:302019-09-02T23:35:40+5:30
आश्रमशाळेच्या कामावर घेऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी आदिवासी विकास विभागाअंतर्गत रोजंदारी वर्ग ३ व ४ कर्मचारी संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या १० ते १५ वर्षांपासून मानधनावर अतिदुर्गम भागात रोजंदारी पद्धतीने कार्यरत जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यापासून डावलण्यात आले आहे. त्यामुळे अन्याय झाला आहे. आश्रमशाळेच्या कामावर घेऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी आदिवासी विकास विभागाअंतर्गत रोजंदारी वर्ग ३ व ४ कर्मचारी संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी गडचिरोली प्रकल्पासह इतर भागातील रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोलीच्या प्रकल्प अधिकाºयांनी यावर्षी जाहिरात पद्धत वापरून नवीन रोजंदारी कर्मचाºयांची निवड केली. परिणामी जुन्या अनुभवी कर्मचाºयांना लावलण्यात आले. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. आमच्या सेवेत खंड पडत असल्याने अनुभवाचे गुण मिळण्यास अडचण जाणार आहे, असे विदर्भ अध्यक्ष व्ही.ए.शेंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.