शहरातील माेलकरणींची साधारण संख्या - ६३२
शहरातील माेलकरणींच्या हाताला मिळेना काम - ४२
बाॅक्स ...
घर कसे चालवावे, याचीच चिंता
काेराेना महामारीने छाेट्या-माेठ्या व्यावसायिक व इतर घटकांसाेबतच मागास असलेल्या व आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेल्या माेलकरीण महिलांच्या कुटुंबांवर संकट काेसळले आहे. राेजी-राेटी बंद झाल्याने घरातील सदस्यांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, याची चिंता या महिलांना सतावत आहे.
बाॅक्स .....
एका घरातून मिळतात ५०० ते ६०० रुपये
भांडे व कपडे धुण्याच्या कामातून एका घरातून महिन्याकाठी या महिलांना ५०० ते ६०० रुपये मिळतात. एक महिला एकादिवशी चार ते पाच घरातील हे काम सांभाळते तर काही कष्टाळू महिला सहा ते सात घरातील काम उरकून घेतात.
काेट .....
सधन घरातील तसेच नाेकरदारांच्या घरी जाऊन तेथील कपडे व भांडे धुण्याचे अनेक महिन्यांपासून काम करीत आहे. मात्र, काेराेना संसर्गाच्या भीतीने मालकाने सध्या तुम्ही कामाला येऊ नका, आम्ही तुम्हाला नंतर बाेलावताे, असे सांगितले. तेव्हापासून माझ्याकडे असलेल्या अर्ध्या घरातील कामे बंद झाली आहेत.
- वनिता ठाकूर
काेट.......
काेराेना महामारीमुळे आमच्यावर बेराेजगारीचे संकट काेसळले आहे. मजुरी बंद झाल्याने घरी लागणारा किराणा सामान व अन्नधान्याची कशी खरेदी करावी, असा प्रश्न आहे. आम्हाला पूर्ववत काम मिळेपर्यंत शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे.
- वैशाली कांबळे
काेट ....
काेराेनामुळे आम्हाला मिळणाऱ्या कामाचे प्रमाण फार कमी झाले आहे. पूर्वी माझ्याकडे पाच ते सहा घरे हाेती. आता केवळ दाेन घरातील काम हाताशी आहे. काेराेनासंदर्भात काळजी घेऊन संबंधित घरी पाेहाेचावे लागते. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
- सखुबाई गेडाम