किसान ॲपचे उशिरा मिळतात संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:36 AM2021-05-24T04:36:03+5:302021-05-24T04:36:03+5:30

गडचिराेली : शेतकऱ्यांना स्मार्टफाेनच्या माध्यमातून घरबसल्या विविध याेजना, पिकांची लागवड तसेच पाऊस व वातावरणाचा अंदाज आदींबाबतची माहिती मिळावी, याकरिता ...

Kisan app gets late messages | किसान ॲपचे उशिरा मिळतात संदेश

किसान ॲपचे उशिरा मिळतात संदेश

Next

गडचिराेली : शेतकऱ्यांना स्मार्टफाेनच्या माध्यमातून घरबसल्या विविध याेजना, पिकांची लागवड तसेच पाऊस व वातावरणाचा अंदाज आदींबाबतची माहिती मिळावी, याकरिता राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे माेबाइल ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. किसान ॲपच्या माध्यमातून शेतकरी उपयुक्त माहिती मिळवीत असले तरी इंटरनेट कनेक्टिव्हिच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे संदेश व माहिती उशिरा प्राप्त हाेत आहे.

राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी किसानॲप, शेतकरी मासिक, महारेन, क्राॅप क्लिनिक, कृषिमित्र, एम किसान भारत, किसान सुविधा, क्राॅप इन्सुरन्स, एकात्मिक कीड व्यवस्थापन, हळद लागवड आदींसह १८ प्रकारच्या ॲपमधून शेतकरी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वेळेवर माहिती मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत.

बाॅक्स ...

ही उपयुक्त माहिती हाेते प्राप्त

महारेन माेबाइल ॲपच्या माध्यमातून मंडळ, तालुका, जिल्हा, विभागस्तरावरील आजचा, आजपर्यंतचा व सर्वसाधारण पावसाची माहिती प्राप्त हाेत असते.

क्राॅप क्लिनिच्या माध्यमातून साेयाबीन, कापूस, धान व हरभरा या पाच पिकांच्या किड, राेग व त्यावरील उपाययाेजनांबाबतची माहिती मिळत असते.

कृषिमित्र ॲपच्या माध्यमातून खते, बियाणे व स्थानिक औषध विक्रेत्यांची माहिती मिळत असते.

बाॅक्स .....

अपडेट वेळेत मिळावे

कृषी विभागाच्या वतीने अलीकडेच दामिनी ॲप कार्यान्वित करण्यात आला आहे. या ॲपच्या माध्यमातून वीज नेमकी काेणत्या भागात पडणार आहे, याचा अंदाज येणार आहे. याबाबतची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र ही माहिती व अपडेट वेळेवर मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

बाॅक्स ....

इशारा मिळाला पण, वादळ येऊन गेल्यानंतर !

काेट ....

माेबाइलच्या माध्यमातून विविध कृषी विषयक उपयुक्त माहिती प्राप्त हाेत आहे. माझी शेती नगरी परिसरात असून, वास्तव्य गडचिराेलीच्या भागात आहे. या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी राहत असल्याने कृषी विभागाचे विविध संदेश प्राप्त हाेत असतात. दुर्गम भागातील शेतकऱ्यांना साेयीचे हाेण्यासाठी त्या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी व नेटवर्कचे जाळे मजबूत करणे आवश्यक बनले आहे.

- मुनींद्र म्हशाखेत्री, शेतकरी

माझ्या माेबाइलवर कृषी विषयक माहितीचे संदेश प्राप्त हाेतात. मात्र बऱ्याचदा कव्हरेजअभावी हे संदेश उशिरा मिळत असल्याने त्याचा उपयाेग हाेत नाही. अनुभवाच्या आधारावर आपण शेती करीत आहे.

- वामन भाेयर, शेतकरी

कृषी विभागाच्या वतीने चामाेर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात माेबाइल ॲपबाबत प्रभावी जनजागृती करण्यात यावी. युवक शेतकऱ्यांसह जुने शेतकरीसुद्धा माेबािलच्या साहाय्याने कृषी विषयक माहितीचा शेती व्यवसायात उपयाेग करू शकतात. लहान शेतकऱ्यांना शासनाच्या याेजनेतून स्मार्टफाेन दिल्यास सर्व शेतकऱ्यांना माहिती मिळविण्यास फायदा हाेईल. यादृष्टीने शासनाने निर्णय घ्यावा.

- याेगेश आभारे, शेतकरी

जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित शेतकरी स्मार्टफाेन व माेबािलचा वापर करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध ॲपच्या माध्यमातून ते शेतीविषयक माहिती जाणून घेत आहेत. देसाईगंज, आरमाेरी, चामाेर्शी, गडचिराेली या चार तालुक्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली असल्याने येथील शेतकऱ्यांना वेळेवर माहिती व अपडेट्स मिळत असतात. मात्र इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना माहिती मिळण्यास अडचण जात आहे.

- एस. एस. कऱ्हाडे, प्रकल्प संचालक, आत्मा गडचिराेली

Web Title: Kisan app gets late messages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.