बेडगाव येथे १०० लोकांची कोविड तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:33 AM2021-04-14T04:33:49+5:302021-04-14T04:33:49+5:30
दाेन दिवसांआधी बेडगावला एकाच दिवशी २२ लाेक कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे या गावात कोरोना वाढता संसर्ग पाहता १२ एप्रिल ...
दाेन दिवसांआधी बेडगावला एकाच दिवशी २२ लाेक कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे या गावात कोरोना वाढता संसर्ग पाहता १२ एप्रिल राेजी बेडगाव पाेलीस मदत केंद्रात कोविड तपासणी शिबिर घेण्यात आले.
तसेच राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण व बेडगाव परिसरात कोरोनाचे वाढते रुग्ण यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन बेडगाव येथे शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी सरपंच चेतानंद किरसान, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, अनिल नानेकर व बोटेकसा येथील डॉ. शुभम वायल व त्यांच्या टीमच्या मदतीने बेडगाव येथील ४५ वर्षांवरील १०० लोकांची कोविड टेस्ट करून ६२ लोकांना काेराेनाचा पहिला डोस शिबिरात देण्यात आला. या दरम्यान मास्क, सॅनिटायझर वापर करून सोशल व संपूर्ण एसओपीचे तंतोतंत पालन करण्यात आले.