बाॅक्स .......
लग्नापूर्वी गराेदरपणाचे प्रमाण अधिक
मुला-मुलींना एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण हे स्वाभाविक आहे. मात्र त्यांना याेग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने विपरित घटना घडून मुलगी गराेदर राहते. याचे गंभीर परिणाम त्या मुलीला व मुलाला भाेगावे लागतात. काही समाजामध्ये मुलगा झाल्याशिवाय लग्न न करण्याची प्रथा आहे. कमी वयात एकमेकांच्या संपर्कात येऊन मुलगी गराेदर राहते. मात्र तिचे वय १८ वर्षापेक्षा कमी राहत असल्याने तिचे गराेदरपण कायद्याच्या कचाट्यात सापडते. तिला बालसुधारगृहात ठेवले जाते तर मुलाविराेधात गुन्हा दाखल हाेऊन त्याला कारागृहात जावे लागते.
बाॅक्स .......
तालुकास्तरावर मैत्र क्लिनिक
किशाेरवयीन मुला-मुलींच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व प्रत्येक तालुक्यातील दाेन प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये मैत्र क्लिनिक निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी समुपदेशकाची नेमणूक करण्यात आली आहे. सदर समुपदेशक किशाेरवयीन मुलांना मार्गदर्शन करतात. शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घेऊनही मार्गदर्शन केले जाते.
बाॅक्स.....
पिअर एज्युकेटरची महत्त्वाची भूमिका
किशाेरस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत काही गावांमध्ये पिअर एज्युकेटर नेमण्यात आले आहेत. ५०० लाेकसंख्येच्या गावात एक मुलगा व एक मुलगी असे दाेन पिअर एज्युकेटर व १ हजार लाेकसंख्येच्या गावात दाेन मुले व दाेन मुली पिअर एज्युकेटर नेमण्यात आल्या आहेत. हे एज्युकेटर गावातील किशाेरवयीन मुला-मुलींना मार्गदर्शन करण्याचे काम करतात.
बाॅक्स .......
८२ हजार मुलींना सॅनिटरी पॅडचे वितरण
शासनामार्फत मासिक पाळी संवर्धन हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८२ हजार किशाेरवयीन मुलींना नाममात्र किमतीत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जात आहे.
काेट......
किशाेरवयीन मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयाेजित केले जातात. गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम भागात कमी वयातच लग्न करण्याची प्रथा आहे. यामुळे मुलगी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची असताना गराेदर राहते. तिच्या पतीला कारागृहाची हवा खावी लागते, तर मुलीला बालसुधारगृहात राहावे लागते. कमी वयात लग्न हाेणार नाही, यासाठी आणखी जागृती करण्याची गरज आहे.
- विशाखा काटवले, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम
बाॅक्स .....
माेबाइलशिवाय करमत नाही
किशाेरवयीन मुलांमध्ये स्मार्टफाेनचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही तास जरी त्यांच्या हातात माेबाइल नसेल तर अस्वस्थपणा वाढत असल्याचे दिसून येते.