जमीन अधिग्रहणाच्या हालचाली वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 01:05 AM2018-12-06T01:05:23+5:302018-12-06T01:06:51+5:30

गेल्या काही वर्षापासून गोंडवाना विद्यापीठाच्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न कायम आहे. अद्यापही विद्यापीठाच्या नावे आवश्यक तेवढी जमीन झाली नाही. सदर मुद्दा बैठकीत आल्यानंतर राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवश्यक तेवढ्या जमिनीच्या अधिग्रहणाचा कार्यवाही लवकर करावी, असे निर्देश पालक सचिव विकास खारगे यांना दिले.

Land acquisition movements have increased | जमीन अधिग्रहणाच्या हालचाली वाढल्या

जमीन अधिग्रहणाच्या हालचाली वाढल्या

googlenewsNext
ठळक मुद्देजागेचे अधिग्रहण लवकर करा : अर्थमंत्र्यांचे पालक सचिवांना निर्देश; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या काही वर्षापासून गोंडवाना विद्यापीठाच्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न कायम आहे. अद्यापही विद्यापीठाच्या नावे आवश्यक तेवढी जमीन झाली नाही. सदर मुद्दा बैठकीत आल्यानंतर राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवश्यक तेवढ्या जमिनीच्या अधिग्रहणाचा कार्यवाही लवकर करावी, असे निर्देश पालक सचिव विकास खारगे यांना दिले.
आ.डॉ.देवराव होळी यांनी विद्यापीठासाठी आवश्यक असलेल्या जमीन अधिग्रहणाची कार्यवाही थंडबस्त्यात असल्याचा मुद्दा ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मांडला होता. या मुद्याच्या अनुषंगाने पालक सचिव विकास खारगे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व कुलगुरूंशी चर्चा करून जमीन अधिग्रहणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व कुलगुरूंना दिले.
गोंडवाना विद्यापीठाच्या जमीन खरेदी संदर्भातील मूल्यांकनाबाबत आ.डॉ.होळी यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. एका महिन्यात जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना आ.डॉ.होळी यांनी अधिकाऱ्यांना केली होती. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, नगर रचनाकार बारई यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंते व कार्यकारी अभियंते आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनापासून सचिव ते मंत्रालयापर्यंत गोंडवाना विद्यापीठाच्या जागेच्या प्रश्नावर बैठकांमध्ये सातत्याने चर्चा होत आहे. यासाठी धोरण आखले जात असल्याने आता गोंडवाना विद्यापीठाच्या जमीन अधिग्रहणाच्या हालचाली वाढल्या आहेत.

Web Title: Land acquisition movements have increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.