अनेक तलाव मोजताहेत शेवटची घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 10:30 PM2019-06-16T22:30:32+5:302019-06-16T22:31:18+5:30
मृग नक्षत्र उत्तरार्धाकडे वळला असून वरूण राजाच्या आगमनाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा चांगल्या प्रकारची जल क्षमता असलेले अनेक तलाव देखील आता शेवटच्या घटका मोजत असल्याने अनेक गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : मृग नक्षत्र उत्तरार्धाकडे वळला असून वरूण राजाच्या आगमनाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा चांगल्या प्रकारची जल क्षमता असलेले अनेक तलाव देखील आता शेवटच्या घटका मोजत असल्याने अनेक गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
आरमोरी-वैरागड मार्गावरील वैरागडपासून चार किमी अंतरावर पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणाºया तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होता. दरवर्षीच्या उन्हाळ्यात या तलावात पाच फुटापेक्षा कमी जलसाठा कधीही राहत नव्हता, असा अनुभव अनेकजण सांगतात. मात्र या वर्षात सदर तलावाने तळ गाठला आहे. या तलावाच्या परिसरात राहणारे वन्यजीव आपली तृष्णा तलावाच्या पाण्यावर भागवित होते. मात्र आता वन्यजीवांची भटकंती वाढली आहे. काही दिवसानंतर वन्यजीवांना पाणी मिळणे कठीण होणार आहे. जंगलातील लहान, मोठे सर्व जलसाठे कोरडे पडले असून वन्यजीवांची तहाण भागविण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याअभावी अनेक वन्यजीव तडफडून प्राण सोडत आहेत. ज्या ठिकाणी अल्प जलसाठा आहे, त्या ठिकाणी शिकार करणारे लोक सापळे रचून प्राणी व पक्षांची शिकार करीत असल्याचे दिसून येत आहे. वैरागड परिक्षेत्रातील चूनबोडी, महादेव तलाव, गोरजाई डोहाने यावर्षी तळ गाठला आहे.
जलसाठे कोरडे पडल्याने जनावरांना तहाण भागविणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतिक्षा असून ज्या शेतकºयांकडे सिंचन सुविधा आहे, असे शेतकरी धान लागवडीसाठी पºहे टाकत आहेत. पावसाने लवकर हजेरी लावल्यास खरीप हंगामाला वेग येणार आहे. शेतकरी वर्ग वरूण राजाची चातक पक्ष्याप्रमाणे प्रतिक्षा करीत आहे.