उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन अखिल भारतीय महिला काॅंग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी केले. कार्यक्रमात काॅंग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी ऑनलाईन सहभागी झाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महिला काँग्रेसची प्रशंसा करून प्राेत्साहन दिले. महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर महिला काँग्रेस खरोखरच महाराष्ट्रभर राजकारण न करता समाजकारण करत आहेत, असे गाैरवाेद्गार काढले.
कार्यक्रमात राजस्थानच्या महिला व बालकल्याणमंत्री ममता भूपेश, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक राज्यमंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश महिला प्रभारी आ. प्रणिती शिंदे, महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, प्रदेश प्रभारी आकांक्षा ओला, आ. प्रतिभा धानोरकर, गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा भावना वानखेडे आदी सहभागी होते.
बाॅक्स
अशी आहे संकल्पना...
काेराेना चाचणी करण्यासाठी गावातील लाेक पुढे येत नसल्याने त्यांना चाचणी करण्यासाठी प्राेत्साहित करणे, त्यांची अँटिजन टेस्ट करणे, टेस्टनंतर संबंधित व्यक्ती बाधित निघाल्यास त्याला काेविड सेंटरमध्ये अथवा विलगीकरण कक्षात उपचारार्थ भरती करणे आदी उपचार पद्धतीचा समावेश ‘एक गाव कोरोनामुक्त’ या संकल्पनेत आहे.