अनमोल गणवीर हा चारचाकी वाहनातून देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून आरमाेरी पाेलिसांना मिळाली. त्यांनी २३ मे राेजी पहाटे आरमाेरी-देसाईगंज मार्गावर रवी गावाच्या फाट्याजवळ पाळत ठेवली. देसाईगंजवरून कार (एमएच ३१ सीपी) येत हाेती. कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने कार थांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. कारची तपासणी केली असता कारमध्ये ७० हजार रूपये किमतीची देशी दारू आढळून आली. तसेच दीड लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध आरमोरी पोलीस स्टेशन येथे दारू बंदी कायद्याच्या कलम ६५(अ), ८३, ९८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक पंकज बोन्डसे, चेतनसिंह चव्हाण, पाेलीस फाैजदार शेडमाके, पोलीस शिपाई एकनाथ ढोरे, पाेलीस हवालदार बीके यांनी केली.
७० हजार रुपयांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:35 AM