निवेदनात, सहायक आयुक्त पशुसंवर्धन पशुधन विकास गट ‘अ’ चा सेवाप्रवेश नियम सुधारावा, पशुधन विकास अधिकारी विस्तार गट ‘अ’ पंचायत समितीच्या या पदनामात बदल करावा. पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या तिसऱ्या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा करावी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजूर करावा, पशुधन विकास अधिकारी गट ‘ब’यांची मॅट मध्ये असलेली प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी, आदी मागण्यांचा समावेश हाेता. आगामी विधानसभा अधिवेशनात सदर प्रश्न मांडून ते सोडविण्याचे आश्वासन आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी दिले. निवेदन देताना डाॅ. प्रकाश बोकडे, डाॅ. देवीदास देव्हारे, डॉ. लोमेश लोंढे, डॉ. नरेंद्र पत्तीवार,डॉ. आनंद गोर्लावार, डॉ. अर्चना महल्ले, डॉ. उमेश नैताम, डॉ. आशा कुमरे, डॉ. रवींद्र साखरे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
290621\img-20210629-wa0081.jpg
===Caption===
आ. डाॅ. देवराव हाेळी यांना निवेदन देताना पशुचिकत्सा संघटनचे सदस्य.