Lok Sabha Election 2019; दारूमुक्त निवडणूक सगळीकडेच व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:42 PM2019-03-30T13:42:22+5:302019-03-30T13:43:55+5:30
निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष देऊन त्यांचे मत पदरात पाडून घेण्याचा प्रकार केवळ गडचिरोलीतच घडत नाही. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचाही आहे. त्यामुळे दारूमुक्त निवडणूक हे अभियान सगळीकडेच सुरु व्हायला हवे, अशी अपेक्षा डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष देऊन त्यांचे मत पदरात पाडून घेण्याचा प्रकार केवळ गडचिरोलीतच घडत नाही. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचाही आहे. त्यामुळे दारूमुक्त निवडणूक हे अभियान सगळीकडेच सुरु व्हायला हवे, अशी अपेक्षा डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली.
निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी सर्च आणि मुक्तिपथद्वारे एक मोहीम हाती घेतली आहे. मतदारांनी आपले अमूल्य मत दारू पिऊन विकू नये. एका बाटलीसाठी या मताचा लिलाव करू नका. या वेळची निवडणूक दारूमुक्त व्हावी. मतदात्यांसोबतच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनीही मतदात्याला नशेत धुंद करून त्याचे मत स्वत:च्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न करू नये, आवाहन डॉ.बंग यांनी केले.
गुरुवारी आरमोरी तालुक्यात आयोजित व्यसनमुक्ती संमेलनात ६० गावांच्या महिलांनी मिळून निवडणुकीत आम्ही दारू वापरू देणार नाही. जो उमेदवार निवडणूक काळात दारूचा वापर करेल त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकू, असा प्रस्ताव केला.