महिला शेतकऱ्यांनी जाणले कमी लागवड खर्चाचे कृषी तंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:42+5:302021-06-30T04:23:42+5:30
जुनी वडसा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ‘महिला कसली, शेती पिकली’ या उक्तीवर भर देण्यात आला. देसाईगंज मुख्यालयाच्या कृषी सहायक ...
जुनी वडसा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ‘महिला कसली, शेती पिकली’ या उक्तीवर भर देण्यात आला. देसाईगंज मुख्यालयाच्या कृषी सहायक कल्पना ठाकरे यांनी १० टक्के रासायनिक खताची मात्रा कमी करून आर्थिक खर्चात बचत व्हावी, याकरिता नत्र खतांऐवजी ॲझाेला वनस्पतीचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले. नैनपूर येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी ॲझाेला व हिरवळीच्या खतांचा वापर केला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी भात लागवड पद्धतीविषयी रूपेश मेश्राम, खत व्यवस्थापन, वेगवेगळे प्रकार, भात लागवड पद्धतीविषयी कृषी पर्यवेक्षक युगेश रणदिवे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तालुका कृषी आधिकारी नीलेश गेडाम, कृषी मंडळ अधिकारी रूपेश मेश्राम, भूषण कुथे, नगरसेविका अश्विनी कांबळे आदी उपस्थित होते.
बाॅक्स
समूहाने कामे केल्यास अनेक फायदे
रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर वाढल्याने लागवड खर्च वाढला आहे. त्यामुळे शेती कसण्याचा खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांना पर्याय म्हणून निंबोळी अर्क तयार करून वापर करावा. तसेच फवारणीची कामे महिलांनी समूहाने आवर्जून करावी. शेतीचे नियोजन करून समूहाने कामे केल्याने बरेच फायदे मिळतात. परिस्थितीनुसार खरीप हंगामाचे नियोजन करावे, असे आवाहनही उपस्थितांनी महिला शेतकऱ्यांना केले.
===Photopath===
270621\40095556img-20210625-wa0041.jpg
===Caption===
मंञी थोरात यांचे कडून निळवंडे कालवे पहाणी फोटो