Maharashtra Election 2019 ; मतदारांची उत्सुकता आणि प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:30+5:30
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणी करण्यात आली. आयटीआय चौक परिसरातून सामाजिक न्याय भवनाकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आयटीआयच्या या मार्गावरील प्रवेशद्वारावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच अपक्ष उमेदवारांच्या काही कार्यकर्त्यांनी चंद्रपूर मार्गावर आयटीआयसमोर मोठी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १० ते १२ दिवस पूर्ण ताकदीने प्रचार केल्यानंतर आपल्या पक्षाच्या व उमेदवाराच्या बाजूने निकाल लागणार, अशी आशा भाजपासह काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना होती. याशिवाय वंचित व शेकापचेही कार्यकर्ते आम्ही दुसऱ्या क्रमांकावर राहू, अशा तोºयात होते. त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी व शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये दुपारपर्यंत उत्सुकता दिसून येत होती.
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणी करण्यात आली. आयटीआय चौक परिसरातून सामाजिक न्याय भवनाकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आयटीआयच्या या मार्गावरील प्रवेशद्वारावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच अपक्ष उमेदवारांच्या काही कार्यकर्त्यांनी चंद्रपूर मार्गावर आयटीआयसमोर मोठी गर्दी केली होती. एका बाजूने नव्याने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर उभे राहून कार्यकर्ते तसेच नागरिक प्रत्येक फेरीची उमेदवारांची मते जाणून घेत होते. आयटीआय समोर कार्यकर्त्यांचा जमाव होते. काही कार्यकर्ते मोबाईलवर फेरीनिहाय मते इतर कार्यकर्त्यांना पाठवित होते तर काही जण भ्रमणध्वनीवरून माहिती देत असल्याचे दिसून आले. सुरूवातीपासून भाजपचे उमेदवार डॉ.देवराव होळी हे थोड्याफार मताने आघाडीवर होते. पाचव्या फेरीनंतर तरी काँग्रेसचे उमेदवार आघाडी घेतील, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात होती. त्यामुळे येथे जमलेले उत्साही कार्यकर्ते पुन्हा निकाल ऐकण्यात व्यस्त झाले. आघाडी मिळत नसल्याचे पाहून काही कार्यकर्ते नाराजही झाले.
काँग्रेस व भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांचा ठिय्या पानटपरी व हॉटेलच्या परिसरात होता. या ठिकाणी निकालाची चर्चा दुपारपर्यंत होत होती. २ वाजतानंतर अनेकजण घरी परतले.