Maharashtra Election 2019 ; निवडणूक कर्मचाऱ्यांनी केली अनेक अडचणींवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:00 AM2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:47+5:30

भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी सदर निवडणूक चोख पोलीस बंदोबस्तात व सुरक्षा व्यवस्थेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते. त्यासाठी त्यांच्या चमूने सहकार्य केले. नक्षलवाद्यांच्या गडामध्ये बऱ्याच प्रमाणात मतदान यशस्वी करण्यात अधिकाऱ्यांना यश आले. अहेरी मतदार संघातील सर्व केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Maharashtra Election 2019 ; Election workers overcome many obstacles | Maharashtra Election 2019 ; निवडणूक कर्मचाऱ्यांनी केली अनेक अडचणींवर मात

Maharashtra Election 2019 ; निवडणूक कर्मचाऱ्यांनी केली अनेक अडचणींवर मात

Next
ठळक मुद्देपोलिसांसोबत पायपीट : हेलिकॉप्टरची महत्त्वपूर्ण मदत

रमेश मारगोनवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी नक्षलग्रस्त अहेरी मतदार संघात मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडणे जिल्हा प्रशासन व पोलीस विभागासाठी मोठे आव्हान होते. मात्र पोलीस अधिकारी व जवानांनी हेलिकॉप्टरची मदत घेत निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोबत ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. निवडणुकीच्या या प्रक्रियेत पोलिसांसह निवडणूक कर्मचाऱ्यांनाही जंगलातून पायपीट करावी लागली.
भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी सदर निवडणूक चोख पोलीस बंदोबस्तात व सुरक्षा व्यवस्थेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते. त्यासाठी त्यांच्या चमूने सहकार्य केले. नक्षलवाद्यांच्या गडामध्ये बऱ्याच प्रमाणात मतदान यशस्वी करण्यात अधिकाऱ्यांना यश आले. अहेरी मतदार संघातील सर्व केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही मतदान केंद्र ऐनवेळी बदलविण्यात आले. दरम्यान घातपात घडवून आणण्याचे नक्षलवाद्यांचे मनसुबे पूर्णत: अपयशी ठरले.
दुर्गम भागात पोलिंग पार्ट्या पोहोचविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. जिल्हा पोलीस व प्रशासनाच्या वतीने अहेरी मतदार संघात दोन हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले होते. पण हेलिकॉप्टरची सोय मुख्यालय ते बेस कॅम्पपर्यंतच होती. मतदान केंद्रातून पोलिंग पार्ट्या बेसकॅम्पपर्यंत साहित्यासह पायी पोहोचल्या. त्यानंतर येथून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अहेरी प्राणहिता मुख्यालयात पोहोचविण्यात आल्या. ताडगाव बेस कॅम्पवरून इरकडुम्मे, चिचोडा, कुकडेली, मन्नेराजाराम, भामनपल्ली, येचली आदी अतिसंवेदनशील केंद्रांवरून पोेलिंग पार्ट्यांना सुरक्षितपणे पोहोचविण्यात आले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Election workers overcome many obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.