Maharashtra Election 2019 ; निवडणुकीत ‘रात्र थोडी, सोंगं फार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 06:00 AM2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:27+5:30

सध्या सोशल मिडियात स्मार्ट फोनवरून होणाऱ्या प्रचारालाही ऊत आला आहे. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर कार्यकर्ते आणि नागरिकांना जोडून आपल्या उमेदवाराचा उदो-उदो आणि प्रचार, गाठीभेटीचे फोटो टाकले जात आहे. एकाच कार्यक्रमाचे अनेक फोटो येत असल्यामुळे अनेक जण या प्रकाराला कंटाळून ते फोटो न पाहताच मोबाईलमधून उडवत आहेत.

Maharashtra Election 2019 ; 'Little by night, good night' in elections | Maharashtra Election 2019 ; निवडणुकीत ‘रात्र थोडी, सोंगं फार’

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीत ‘रात्र थोडी, सोंगं फार’

Next
ठळक मुद्देपूर्वतयारी नसणाऱ्या उमेदवारांची तारांबळ : दरदिवशी २० गावे पिंजून काढताना होणार दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता खºया अर्थाने सुरूवात झाली आहे. मंगळवारी उमेदवारांना अधिकृत चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचारसाहित्य तयार करण्याच्या कामाला वेग आला. पण गावोगावी प्रचार करून जनमत आपल्या बाजुने करण्यासाठी उमेदवारांच्या हाती जेमतेम १० दिवस आहेत. अशा स्थितीत दरदिवशी १५ ते २० गावे पिंजून काढताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.
यावेळी प्रत्येक मतदार संघात केंद्रीय निवडणूक आयोगाचे दोन-दोन निवडणूक निरीक्षक सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. याशिवाय प्रचार यंत्रणेवरील खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र निरीक्षक आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारावरही बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. आयोगाने दिलेल्या २८ लाख रुपयांच्या खर्चाच्या मर्यादेत राहून प्रचार आणि प्रसिद्धी करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
यावेळी बहुतांश प्रमुख उमेदवारांना पक्षाचे तिकीट आपल्यालाच मिळणार की नाही याचीही शाश्वती वाटत नव्हती. त्यामुळे बरेच उमेदवार जनसंपर्क सोडून मुंबई-दिल्ली-नागपूरच्या वाऱ्या करण्यात जास्त व्यस्त होते. एकदाचे तिकीट निश्चित झाल्यानंतरच त्यांचा जीव भांड्यात पडला. अशा स्थितीत कमीत कमी वेळेत प्रत्येक गावात पोहोचण्याचे आव्हान सर्व उमेदवारांपुढे आहे.
सध्या सोशल मिडियात स्मार्ट फोनवरून होणाऱ्या प्रचारालाही ऊत आला आहे. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर कार्यकर्ते आणि नागरिकांना जोडून आपल्या उमेदवाराचा उदो-उदो आणि प्रचार, गाठीभेटीचे फोटो टाकले जात आहे. एकाच कार्यक्रमाचे अनेक फोटो येत असल्यामुळे अनेक जण या प्रकाराला कंटाळून ते फोटो न पाहताच मोबाईलमधून उडवत आहेत. पण कार्यकर्ते मात्र आपण व्हॉट्स अ‍ॅपवर प्रचार करण्यात यशस्वी झाल्याचे समजून नेत्यांची वाहवा मिळवताना दिसतात.
गुरूवारपर्यंत दुर्गा उत्सवामुळे कार्यकर्त्यांच्या जेवणाचा खर्च कमी होता. पण दुर्गोत्सवानंतर त्यांच्या जेवणाचा खर्च वाढणार असल्यामुळे कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी उमेदवारांचा खर्चही वाढणार आहे.

होळींपुढे वेगळीच अडचण
गडचिरोली मतदार संघासह सर्वच मतदार संघात यावेळी मुक्तिपथ अभियानाच्या पुढाकाराने दारूमुक्त निवडणुकीचा विषय चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचे समीक्षण करावे, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ.देवराव होळी यांनी व्यक्त केल्याने दारूबंदीला त्यांचा विरोध असल्याची आवई उठली होती. नंतर त्यांनी सारवासारव केली असली तरी हीच बाब त्यांना अडचणीत आणू शकते.

कोडवतेंकडे कार्यकर्त्यांची वानवा
जिल्ह्यातील तीनही मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये गडचिरोलीतील काँग्रेसच्या उमेदवार डॉ.चंदा कोडवते सर्वात नवख्या आहेत. यापूर्वी कोणतीही निवडणूक लढण्याचा अनुभव नसणे, त्यामुळे कार्यकर्त्यांचा संग्रह नसणे आणि वेळेवर उमेदवारी जाहीर झाल्याने जनसंपर्काचा अभाव या त्यांच्या कमकुवत बाजू त्यांच्यासाठी सर्वात मोठा अडसर ठरू शकतात. अशा स्थितीत डॉ.कोडवते यांना आपल्या कमकुवत बाजू पक्क्या करण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. मात्र कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यात त्यांची यंत्रणा कमी पडत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरून ते दुरावत आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 ; 'Little by night, good night' in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.