दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २००० पूर्वीपर्यंत मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. त्यावेळी काही नागरिक दोनपेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करीत होते. असे मतदान अवैध ठरत होते. १९९५ च्या निवडणुकीत सुमारे ७ हजार १७५ तर १९९९ च्या निवडणुकीत ७ हजार १२८ मतदान अवैध ठरले होते.१९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभेच्या नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडले. या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. मतदाराला मतदान करण्यासाठी निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका दिली जात होती. योग्य उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारून सदर मतपत्रिका पेटीत टाकली जात होती. एकाच उमेदवाराला टाकलेले मत वैध ठरविले जाईल, असा निवडणूक विभागाचा नियम आहे. मात्र काही मतदार एकापेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करीत होते. त्यामुळे सदर मतदान अवैध ठरत होते. काही मतदार शिक्का न मारताच मतपत्रिका पेटीत टाकत होते तर काहींचा शिक्का व्यवस्थित उमटत नव्हता. काही वेळेला दोन निवडणूक चिन्हांच्या मध्ये शिक्का बसल्याने नेमके कुणाला मतदान झाले, हे स्पष्ट होत नव्हते. परिणामी सदर मतदान अवैध ठरविले जात होते. मतपत्रिकांचा वापर जोपर्यंत सुरू होता, तोपर्यंत अवैध मतांची संख्या अधिक होती. दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना मतदान कसे करावे, याबाबतही पुरेशी माहिती राहत नव्हती. परिणामी मते अवैध ठरण्याचे प्रमाण अधिक राहत होते.२००४ नंतर ईव्हीएमचा वापर सुरू झाला. ईव्हीएममध्ये एकदाच मतदान करण्याची मुभा आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये अवैध मते ठरत नाही. आता ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच होणार आहे. निवडणूक कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. पोस्टल मतदान सुद्धा मतपत्रिकेप्रमाणेच राहते. त्यामुळे सदर मतदान अवैध ठरण्याची शक्यता राहते. २००४ च्या निवडणुकीत १९ मतदान अवैध ठरले होते. २००९ मध्ये ४७ तर २०१४ च्या निवडणुकीत ३०१ मतदान अवैध ठरले होते.ईव्हीएममुळे अवैध मतांची समस्या सुटलीईव्हीएममध्ये मतदाराला एकदाच बटन दाबण्याची मुभा मिळते. त्यानंतर मशीन आपोआप लॉक होते. त्यामुळे तोे दुसऱ्यांदा बटन दाबू शकत नाही. दुसऱ्यांदा बटन दाबले तरी मशीन प्रतिसाद देत नाही. त्यामुळे अवैध मते ठरत नाही. या मशीनचा कंट्रोलिंग मतदान केंद्राधिकाºयाकडे राहते. दुसरा मतदार आल्यानंतर मतदान केंद्राधिकारी त्याच्याकडे असलेली बटन दाबते. त्यानंतर दुसºया मतदाराला मतदान करता येते. ईव्हीएममुळे अवैध मतांची समस्या दूर झाली आहे.
Maharashtra Election 2019 : १९९५ मध्ये ठरली होती सर्वाधिक अवैध मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:00 AM
१९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभेच्या नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडले. या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. मतदाराला मतदान करण्यासाठी निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका दिली जात होती. योग्य उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारून सदर मतपत्रिका पेटीत टाकली जात होती. एकाच उमेदवाराला टाकलेले मत वैध ठरविले जाईल, असा निवडणूक विभागाचा नियम आहे.
ठळक मुद्देईव्हीएमनंतर घटले प्रमाण : विधानसभेसाठी पहिल्यांदाच होणार व्हीव्हीपॅटचा वापर