Maharashtra Election 2019 ; आता गुप्त प्रचारावर जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:28+5:30

जिल्ह्यातील तीनही मतदार संघांमधील ९३२ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी ४५ टक्के केंद्र संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासूनच तीन हेलिकॉप्टरच्या मदतीने बेस कॅम्पवर नेण्याचे काम सुरू होते. शनिवारीही हे काम सुरूच होते.

Maharashtra Election 2019 ; Now the emphasis on secret propaganda | Maharashtra Election 2019 ; आता गुप्त प्रचारावर जोर

Maharashtra Election 2019 ; आता गुप्त प्रचारावर जोर

Next
ठळक मुद्देरॅलींमधून उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन । निवडणुकीचे भोंगे झाले शांत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी दुपारी ३ वाजता शांत झाली. अनेक उमेदवारांनी शहरी भागात रॅलींमधून शक्तीप्रदर्शन करत मतदारांना शेवटचे आवाहन केले. आता सोमवारच्या सकाळपर्यंत गुप्त प्रचारातून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न होणार असल्यामुळे विविध पथकांसह पोलीस यंत्रणेला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.
जिल्ह्यातील तीनही मतदार संघांमधील ९३२ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी ४५ टक्के केंद्र संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासूनच तीन हेलिकॉप्टरच्या मदतीने बेस कॅम्पवर नेण्याचे काम सुरू होते. शनिवारीही हे काम सुरूच होते. याशिवाय इतर केंद्रावरील कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाच्या बस व इतर वाहनांनी रवाना करण्यात आले.
शनिवारी अहेरी मतदार संघातील २२३ केंद्रांवरील कर्मचारी, आरमोरी मतदार संघातील १३५ केंद्रांवरील कर्मचारी तर गडचिरोली मतदार संघातील ९० केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी विविध साहित्यासह रवाना करण्यात आले.
आतापर्यंत नाकाबंदीदरम्यान केलेल्या वाहनांच्या तपासणीत अनधिकृत रक्कम, दारू आणि दारूची आयात करणाऱ्या वाहनांना मिळून एकूण ८५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. विशेष म्हणजे गडचिरोलीच्या सभोवताल सीमा लागून असणाऱ्या छत्तीसगड आणि तेलंगणासह एकूण ७ जिल्ह्यांच्या सीमेत ५ किलोमीटरपर्यंतच्या परिसरात दि.२१ पर्यंत दारूबंदी लागू करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
प्रत्येक मतदार संघात सखी बुथ (सर्व महिला कर्मचारी) राहणार असून गडचिरोली मतदार संघात ३, तर आरमोरी आणि अहेरी मतदार संघात प्रत्येकी एक बूथ सखी बुथ राहणार आहे. त्या ठिकाणी ेकेंद्राधिकाऱ्यापासून तर सुरक्षा रक्षकापर्यंत सर्व जबाबदाºया महिलांकडेच राहतील.

मतदानाची सर्वोच्च टक्केवारी गाठण्याचे आवाहन
जिल्ह्यातील मतदार सूज्ञ असून प्रत्येक मतदार मतदानाचा अधिकार बजावतील, असा विश्वास व्यक्त करताना या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी लोकसभेत झालेल्या मतदानाची टक्केवारी (७१.९८ टक्के) पार करून सर्वोच्च टक्केवारी गाठावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केले. त्यांनी निवडणुकीच्या तयारीची पूर्ण माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे, ना.तहसीलदार सुनील चडगुलवार उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Now the emphasis on secret propaganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.